शिवाजीचा इतिहास धैर्याचा,शौर्याचा अन् औदार्याचा. - डॉ.प्रा.धनराज खानोरकर .

 


शिवाजीचा इतिहास धैर्याचा,शौर्याचा अन् औदार्याचा. - डॉ.प्रा.धनराज खानोरकर .


एस.के.24 तास

ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) अ-हेरनवरगाव दि.१०/०३/२३ शिवजयंती उत्सवानिमित्त  जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचे झाकी प्रदर्शनाने गावकरी झाले आनंदी.


" शिवाजी महाराज कीर्तीवंत,नीतीवंत,शिलवंत आणि धैर्यवंत आहेत. हा लोककल्याणकारी राजा लोकांसाठीच झटला. स्ञियांचा आदर, सर्वसामान्यांची कदर अन् रयतेचे ख-याअर्थाने फादर कोण असेल तर छञपती शिवाजी महाराज होत,त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी कारण त्यांचा इतिहास हा र्धेर्याचा ,शौर्याचा अन् औदार्याचा राहिला आहे. "तसेच देशी पितो तो देशाला विसरतो आणि जो विदेशी पितो बोलत नाही. आपल्याला जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आपल्याला ताट मानेने जगता यावे यासाठी त्यांचे विचार सदैव आपल्या हृदयात कोरून ठेवा,विचारांची शिदोरी बांधा असे मत प्रसिद्ध वक्ते डॉ,धनराज खानोरकर नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय,ब्रह्मपुरी यांनी मांडले.


 ते अ-हेर -नवरगाव येथिल शिवजयंती उत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाकी च्या माध्यमातून काढलेली फेरी ही आकर्षणाचा विषय ठरली.व शिवजी महाराजांच्या इतिहासातील विविध प्रसंगावर झाकी प्रदर्शन करण्यात आली यावेळी प्रेक्षकांची एकच गर्दी उसळली होती.


सदर कार्यक्रमानिमित्त विचा़रपीठावर उद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य दिपालिताई मेश्राम,सौ.पुनमताई ठेंगरे,अॅड.हेमंत उरकुडे, संजय बगमारे सरपंचा सौ.दामिनी चौधरी उपसरपंच,जितेंद्र क-हाडे,सुभाष ठेंगरे,प्रा.सुयोग बाळबुद्धे,अमरदीप लोखंडे,ऋषी कुमार ठेंगरे इ. मान्यवर उपस्थित होते.अॅड. उरकुडे यांनी, शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असून त्यांचा इतिहास हा कल्याणासाठीच आहे,असे मौलिक मार्गदर्शन केले.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विनीत ठेंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रसिक उरकुडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !