भंडारा जिल्ह्यात जागतिक क्षयरोग दिन साजरा.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन व जागतिक क्षयरोग आठवडा साजरा करण्यात आला या निमित्त तालुका क्षयरोग पथक, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर येथे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भंडारा येथे २४ मार्च ला जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र येथे साजरा करण्यात आला.या वेळी सामान्य रुग्णालय येथून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दीपचंद सोयाम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुवर,यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरी व अक्षय प्लस जनजागृती रथाचे उद्घाटन केले.
शहरातील विविध मार्गाने रॅली व जनजागृती रथ द्वारे जनजागृती करून रॅलीचे समारोप शारदा लॉन येथे करण्यात आले या स्थळी क्षयरोग क्षेत्रात काम करणाऱ्या उत्कृष्ट आशा वर्कर व इतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्याधिकारी विवेक बोंदरे, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकूवर,जिल्हा क्षयरोग अधिकारी हितेश तायडे, जिल्हा क्षयरोग वैद्य अधिकारी रवींद्र उदापुरे, आठवल्या समाजकार्य विद्यालयाचे प्राध्यापिका नाकतोडे, श्रीमती वर्मा,डॉ. कावळे, डॉ. अक्षय कमाने, अक्षय प्लस टीमलीड शाहिद अली प्रमुख्याने उपस्थित होते यावेळी क्षयरोगाचे जनक रॉबर्ट कॉक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मुख्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी क्षयरोगाबद्दल जनजागृती पर परिसंवाद दिला.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी ‘टीबी हरेगा, देश जितेगा’, निक्षय मित्र’, आदी आली. निक्षय पोषक आहार योजना विषय प्रस्ताविक भाषणातून माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन शिवशंकर शेंडे, व आभार प्रदर्शन डॉक्टर उदापुरे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात क्षयरोग विभाग कार्यालयाचे अधिकारी ,कर्मचारी,आशा ,अक्षय प्लस चे एलटीबीआय समन्वयक,नर्सिंग कॉलेजचे, आठवले कॉलेज चे विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
▪️अक्षय प्लस प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र मधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये लेटेंट टीबीवर कार्य सुरू असून यामध्ये फुफुसाचे क्षयरोग असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट थेरेपी देण्यात येत आहे.
नेहमी फुफ्फुसाच्या क्षय रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांना क्षय रोगाच्या संसर्ग होतो हो शरीरातली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर त्यांना क्षयरोग होऊ शकतो क्षयरोग पासून सुरक्षित राहण्यासाठी टीपिटी उपचार पद्धती अमलात आली आहे भविष्यात टीबीच्या आजार होऊ नये व परिवार टीबी अजारा पासून सुरक्षित रहावे यासाठी सहा महिन्याकरिता औषध उपचार जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत देण्यात येत आहे.
शाहिद आली,टीम लीड,अक्षय प्लस प्रोजेक्ट भंडारा व गोंदिया