आठ महिन्यातच उखडला रस्ता ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा.

आठ महिन्यातच उखडला रस्ता ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा.


एस.के.24 तास


 भंडारा : (नरेंद्र मेश्राम) ग्रामीण भागातील रस्ते हे नागरिकांना मुख्यालयाला जोडण्याचे महत्वाचे माध्यम आहे.रस्त्यानं अभावी अनेक गावे विकसपासून वंचित आहेत.यासाठीच शासनाकडून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते मात्र अनेक ठिकाणी सबंधित यंत्रणेकडून निकृष्ट काम झाल्याने त्या गावांची अपेक्षा पूर्ती होत नाही याचेच उदाहरण पालांदूर ते पहाडी मार्गावर बघायला मिळत आहे. 


 लाखनी तालुक्यातील पालांदूर  पासून दोन किमी अंतरावर असलेल्या पहाडी गावाला मुख्य बाजारपेठ,शासकीय कार्यालय यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे.या रस्त्याचे मागील वर्षी मे - जून महिन्यात रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण झाले होते.त्यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दर्जा वरून काम बंदही केले होते.


मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनं नंतर ते काम पूर्ण झाले होते.त्यावेळी रस्त्याचे काम सुरू असतानाच हाताने रस्त्यातील गित्ती निघत असल्याचे समोर आले होते.मात्र या कामाच्या दर्जात कसलीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही आता जेमतेम आठ महिने होताच या रस्त्यावर वरील चुरी ही हाताने जमा करण्याजोगी निघालेली आहे. 


आता या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेत समोरील पावसाळ्यात  या रस्त्याने प्रवास करणेही काठील जाईल त्यामुळे असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदार सह पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे. संबंधितावर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


रस्ता बनला,उखडला पण फलक लागले नाही.


या कामाच्या ठिकाणी रस्त्याची माहिती देणारा फलक लावलेला नाही या संबंधी कर्मचाऱ्यांना विचारले असता तो फलक काम पूर्ण झाल्यावर लावल्या जातो असे  मागील वर्षी सांगण्यात आले होते मात्र बनलेला रस्ता उखडून गेला तरी या रस्त्यावर माहिती फलक लावलेला नाही त्यामुळे  रस्ते बनविण्याचा उद्देश हा गावांना जोडण्याचा नसून कंत्राटदारांचे कमाईचे साधन आहे.असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


निकृष्ट कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत.-


गावाला जोडणारा रस्ता हा गावाच्या विकासाचा मार्ग समजला जातो.पक्क्या रस्त्यामुळे    गावातील नागरिकांना विविध व्यवसाय करतात येतात तर उत्पादित मालाची बाहेर विक्रीही करता येते यातून गावचा आर्थिक विकास होत असतो मात्र ह्या पक्क्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे  ग्रामीण नागरिकांचा विकास ठबविला जात आहे.शासनाने अश्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.या एका रस्त्यामुळे गावातील शेतकरी,विद्यार्थी प्रवासी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अनेकदा या रस्त्यावर अपघातही होतात त्यामुळे याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


गावाला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे.आणि या मार्गाचे डांबरीकरण करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असताना काम थांबविला होता मात्र त्यावेळी असलेले अभियंता श्री शेख यांनी कंत्राटदाराचे काम बघून बिल थांबविण्यात येणार असल्याचे सांगितले होते मात्र येतील काहीही झालेले दिसत नाही त्यामुळे कंत्राटदार व पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे. 

 - संदीप देऊळकर.माजी ग्रा.प.सदस्य.पहाडी.


ग्रामीण भागातील नागरिकांचा रस्त्यांशिवाय विकास नाही.मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगमताने असे निकृष्ट काम होत असतील तर या अधिकाऱ्यांवरही शासनाने कार्यवाही करावी व रस्त्याची दुरुस्ती करावी अशी विनंती आहे.

- प्रमोद भुते उपसरपंच गट ग्रा.प.कवलेवाडा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !