प्राथमिक शाळा जेप्रा व मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा.

प्राथमिक शाळा जेप्रा व मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 8 मार्च 2023 ला  जि प उच्च प्राथमिक शाळा जेप्रा व मॅजिक बस जेप्रा यांच्या संतुक्त विद्यमाने जि प शाळेच्या  हॉल व  भव्य पटांगनावर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी मा श्रीमती शशिकला झंजाड सरपंच ग्रा पं जेप्रा, प्रमुख अतिथी मा सुवर्णा कोडाप सदस्य ग्रा पं जेप्रा, मा ममिता मेश्राम सदस्य शा व्य स जेप्रा, मा श्रीमती सुनीता चुनारकर अंगणवाडी सेविका, मा श्रीमती छाया नक्षीने अंगणवाडी सेविका,कु यशोदा   मोहुर्ले  अंगणवाडी सेविका,श्रीमती,आशा जेंगठे आशा वर्कर, मा कु आशा हर्षे मॅडम,मा,कु पायल गावंडे मॅडम,मा श्री,समीर भजे, मा श्री लेखाराम हुलके मॅजिक बस,मा,कु,मेघा धुडसे, मा कु रीना बांगरे उपस्थित होते.


या कार्यक्रमाला कु आशा हर्षे मॅडम,कु पायल गावंडे मॅडम,श्री लेखाराम हुलके सर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थिनीचे  संगीत खुर्ची, चमचा गोळी, वन मिनिट गेम घेण्यात आले. तसेच महिलांचे डच बॉल हा गेम घेण्यात आला.विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाला जवळपास 50 ते 60 महिला उपस्थित होत्या.सर्वांनी एकमेकांना गुलाल लावून रंगपंचमी साजरी केली.सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट देण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन कु मेघा धुडसे व आभार कु रीना बांगरे यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !