ब्रम्हपुरी रेल्वे क्रॉसिंग वर तातडीने उड्डाणपूल बांधा ; अन्यथा चक्का जाम,रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा. ★ सर्व पक्षांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

ब्रम्हपुरी रेल्वे क्रॉसिंग वर तातडीने उड्डाणपूल बांधा ; अन्यथा चक्का जाम,रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा.


★  सर्व पक्षांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१७/०३/२३ब्रम्हपुरी  शहर हे शैक्षणिक ,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,आरोग्य,क्रीडा क्षेत्रात नावारूपास आलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी  वाढती बाजारपेठ ,दळणवळण, मुबलक सुविधा उपलब्ध आहेत, ब्रम्हपुरी चा वाढता विस्तार , लोकसंख्या ,वाढते वाहने यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो, विशेष म्हणजे ब्रह्मपुरी तेआरमोरी, गडचिरोली रोडवर रेल्वे क्रॉसिंग मुळे वाहनधारकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते.



     ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड जवळ रेल्वे स्टेशन असुन बल्लारशा ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सदर रेल्वे रुळावरून तासामागे पॅसेंजर व मालवाहू रेल्वे गाड्या सुरू असतात.रेल्वे गाडी येत असली की,रेल्वे फाटक बंद राहील्या मुळे एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागलेली असते. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ पण असते. त्याचबरोबर सदर ठिकाणी असलेल्या गतिरोधक मुळे सुद्धा ट्रक व मोठे जडवाहन प्रवास करत असताना अडतात अशावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक रोखली जाते.प्रसंगी पर्याय व्यवस्थेनुसार वाहतूक पोलिस असोत की,रेल्वेचे कर्मचारी यांना बोलावून वाहतूक सुरळीत केली जाते.


 मात्र  शाळेकरी विद्यार्थी- विद्यार्थिनी' दवाखान्यात येणारे रुग्ण असो किंवा सरकारी नोकरी करणारे अश्या महत्त्वपूर्ण व्यक्ती वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचू शकत नाही.त्यामुळे त्यांना नाहक कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात या अगोदर सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुद्धा सदर मागणी संदर्भात बरेच निवेदन देण्यात आले मात्र आजतागायत सदर उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यात अपयश आला आहे.


सदर उड्डाण पुलाच्या कामाला येत्या पंधरा दिवसात सुरुवात करण्यात न आल्यास ब्रह्मपुरीतील सर्व पक्ष ,सामाजिक संघटना व नागरिकांच्या  वतीने चक्का जाम,रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा ब्रम्हपुरी विकास मंचाचे निमंत्रक तथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष विधानसभा प्रमुख काँग्रेस विनोद झोडगे यांनी दिला आहे.


यावेळी ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय चहांदे , ब्रह्मपुरी चे स्टेशन प्रबंधक रेल्वे विभाग, तहसीलदार उषा चौधरी, पोलीस स्टेशन, यांना निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत सदर मागणी संदर्भातले निवेदन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, यांना पाठवण्यात येणार आहे.


यावेळी निवेदन देताना विनोद झोडगे, प्रा.देवेश कांबळे,प्रशांत डांगे,प्रा.डी के मेश्राम, विलास उरकुडे, सुरज शेंडे, मिलिंद भानारे, नरु नरड,रामजी मंडपे, सुधीर दोनाडकर, संतोष वाघधरे, मोंटू पिलारे,दत्तात्रय दलाल,लीलाधर वंजारी, जीवन बागडे, विनोद दोनाडकर,विजय रामटेके,  सुधीर आष्टीकर, सिद्धेश्वर भरै, , शरद कुथे, सुनील राऊत, कृष्णा रहाटे, सिद्धार्थ वंजारी, प्रभुजी लोखंडे, आधी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !