सखी मैत्री ग्राम संघातर्फे जिल्हा परिषद शाळा गडिसुर्ला येथे जागतिक महिला दिन साजरा.

सखी मैत्री ग्राम संघातर्फे जिल्हा परिषद शाळा गडिसुर्ला येथे जागतिक महिला दिन साजरा.


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : दरवर्षी प्रमाणे आपल्या गावामध्ये (गडिसुर्ला) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उम्मेद) अंतर्गत सखी मैत्री ग्राम संघातर्फे जिल्हा परिषद शाळा गडिसुर्ला येथे ०८ मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.जागतिक महिला दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

तारेवरची कसरत करता करता चूल आणि मूल सांभाळत असलेल्या महिलांना त्यांच्यामध्ये सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी खास महिलांसाठी एकलनृत्य,समुह नृत्य,नाटिका,नक्कल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटक,सौ,शारदाताई येनूरकर सरपंच ग्रा, प,गडीसुरला,अध्यक्ष सौ,सुवर्णा ताई आकंपल्लीवर तुलसी प्रभाग संघ अध्यक्ष बेंबाळ,प्रमुख पावणे श्री चंदू भाऊ मारगोनवर माजी सभापती प,स,मूल,श्री घनश्याम भाऊ येनूरकर अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी गडीसुरला, श्री संजय भाऊ येनूरकर माजी सरपंच,सौ चेतनाताई येनूरकर माजी सरपंच, करिष्मा वाढई उप सरपंच, प्रीतम आकुलवार सदस्य ग्रा, प,व सर्व सदस्य गण ग्राम, प, गडीसुरला  तसेच जिल्ह्य, प, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व सदस्य गण, व जिल्हा प, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी वृंद,आणि गावातील नागरिक  व महिला उपस्थित होते,कार्यक्रमाला मेहनत घेणारे महिला, सौ सीमा आंबटकर,सौ निलोफर शेख,सौ सोनाली शेंडे, सौ हेमलता बुटले सौ दीपा ताई मुप्पीडवार, सौ,दीक्षा मोहूर्ले,व सखी,मैत्री ग्राम संघाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते.


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !