घोसरीच्या बाळु ने केला सत्यशोधक विवाह.
एस.के.24 तास
सावली : (वृत्तसंकलन - मंगल राजे मशाखेत्री) घोसरी येथील चि.श्रीधर उर्फ बाळू सौ. मंदाबाई श्री माधवराव वाकूडकर यांचे तृतीय चिरजीव मु.घोसरी ता.पोभूर्णा जिल्हा चंद्रपूर यांचे विवाह सावली तालुक्यातील हिरापुर येथील श्रीमती,वदंनाताई विनोदजी गोहणे यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का.पौर्णिमा उर्फ स्नेहायांचे शी सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला.
लागला विशेष उपस्थिती मान.डॉ.राकेश भाऊ गावतुरे बाल रोग तज्ञ चंद्रपूर यांनी या सत्यशोधक विवाह सोहळयास उपास्थित राहून लग्नाच्या आधी सत्यशोधक विवाहाची महती उपस्थित संपूर्ण पाहुणे मंडळींना मार्गदर्शन करीत सत्यशोधक विवाहाला सुरवात करण्यात आली.
विवाहाच्या आधी राजमाता जिजाऊ आऊसाहेब,कुलवाड्डी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, तात्यसाहेब महात्मा जोतीराव फुले व सावित्रीआई फुले यांचा फोटो ला नमन होवून फुले उधळून राजमाता जिजाऊ आऊसाहेब, कुलवाड्डी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, तात्यसाहेब महात्मा जोतीराव फुले व सावित्रीआई फुले यांच्या विचारावर प्रेरित होऊन चि. श्रीधर व चि.सौ का. पौर्णिमा यांनी घेतलेला निर्णय आज दिनांक २७/०३/२०२३ ला हा सत्यशोधक विवाह हिरापूर मुक्कमी वधूच्या मंडपात घडुन आला.
या वेळी लग्नाच्या आगोदर मुलाच्या व मुलीच्या मामा मामीनीं एकमेकांना थोर विचारवंतांचे पुस्तक देवुन स्वागत सत्कार करण्यात आला.त्या नंतर मुलांच्या आई वडिलांकडून मुलीच्या आईला थोर विचारवंतांचे पुस्तक देवुन स्वागत सत्कार करत वर चि.श्रीधर उर्फ बाळू व चि.सौ.का.पौर्णिमा उर्फ स्नेहा यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाहाच्या विचारांना वचन बद्ध होत या विवाहाला सुरवात करण्यात आली.
यावेळी नेहमी लग्नात वाजणारे मंगलाष्टके न म्हणता सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मंगलाष्टकाने वधु वरांच्या हजारो पाहुणे मंडळीच्या साक्षीने हा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला.सर्व उपस्थितांनी या विवाह पद्धतीची स्तुती केली.