सिल्ली ग्रामपंचायत मध्ये जागतिक महीला दिन साजरा.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम)नजीकच्या सिल्ली ग्रामपंचायत कार्यालयात दि.8 मार्च 2023 ला जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील 200 महिला सहभागी झाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.सुचिता पडोळे, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सामंत सुखदेवे,ग्रामविकास अधिकारी श्यामराव नागदेवे अंध दामपत्त्य मीरा मदारकर जेष्ठ महिला माजी सरपंच कुसुमताई बन्सोड, महिला सदस्य ममता चोपकर, अश्विनी माकडे, संगीता माकडे, सविता कुंभलकर, सरोजनी मेश्राम, मंदा माकडे तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. याप्रसंगी गावातील अंध महिला दाम्पत्य चे साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सर्व महिलांचे फुलांचे गजरे देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन महिला सदस्य सौ अश्विनी माकडे यांनी केले.या कार्यक्रमाला सरपंच सुनीता पडोळे यांनी मार्गदर्शन केले व आरोग्य सेविका चंदा झलके यांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी व शासनाच्या विविध योजना विषयी माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी श्यामराव नागदेवे यांनी संविधानाचे वाचन करून महिलांनी न्याय हक्कासाठी जागृत रहावे असे महिला दिनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी महिलांचे विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व विजेता महिलांचे भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले तर आभार ममता चोपकर यांनी मानले.