अरुणाचल च्या राष्ट्रिय मंचा वर गडचिरोली कलावंतांनी महाराष्ट्राचे नेतृत्व.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
"आम्हीं धन्य झालो,
कलावंत म्हणूनी जन्मासी आलो...
आईच्या पदराखाली,
मातृ भू ऋणाचे अमृत प्यालो...."
कवी सुशिल यांच्या या काव्य ओळी अर्थातच गडचिरोलीतील प्रणय मेडपल्लिवार, महेश वाढई,पियूष कामिडवार,खोमेष बोबाटे , मयुर चौधरी,प्रतीक्षा,शहारे, कृष्णाली पोटावी ,दिव्या भोयर,कल्याणी शेडमाके,लीना पतोडी , यासारख्या काही मोजक्याच कलावंताना असाव्यात,असे जाणवते.
जगाचे लक्ष वेधून घेणारी G-20 शिखर परिषद आणि त्यातच भारताला मिळालेले G-20 मधील अध्यक्षस्थान,अर्थातच 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे सहर्ष स्वागत प्रसंगी जुळून आलेला दुग्धशर्करा योग आहे. संपूर्ण देश, भारताच्या या स्तुत्य उपक्रमाची स्तुती करत असतानाच सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आपल्या अथक परिश्रमाने भारताच्या मातीतील लोक कलावंतांची निवड करून या देशाची लोक संस्कृतीची ओळख जगाला पटवून देण्याचे कार्य अविरत करत आहे .
त्यातल्या त्यात लोककलेचा वारसा जपणाऱ्या गडचिरोलीतील या कलावंतानी महाराष्ट्राची लोक कलेचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करून विदर्भाची मान स्वाभिमानाने उंचावली असच म्हणता येईल.
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून उत्तर पूर्व सांस्कृतिक केंद्र दिमापुर यांच्या वतीने नुकताच 17 ते 19 मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सहा राज्यातील लोक कलावंतांना त्यांच्या लोककलेची देवाण घेवाण करता यावी याकरिता "भारत को जानो" या सांस्कृतिक कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. यात नालंदा लोक कला मंच च्या माध्यमातून गडचिरोली तील या कलावंतांनी राष्ट्रिय स्तरावर प्रतिनिधित्त्व केले.
विदर्भातील गडचिरोली,नागपूर भंडारा,चंद्रपूर अशा नक्षल ग्रस्त दुर्गम भागातील कलावंतांनी नालंदा लोककला मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकधारा लावणी लोक कला नृत्य , कोळी नृत्य आणि जोगवा या तीनही प्रकारचे लोक नृत्य सादरीकरण करून G-20 च्या मंचावरून गरुड भरारी घेतली.आपल्या कलेचे यथार्थवादी सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकली. सोबतीला मिझोराम,आसाम,राजस्थान,मध्य प्रदेश,नागालँड या राज्यातील लोककलेच्या आस्वाद प्रेक्षकांना मनसोक्त घेता आला.
लोककलावंत सुशील खांडेकर यांच्या माध्यमातून स्वतः लिहून संगीतबद्ध केलेले गीत "आओ भारत को जाने हम " भारतातील संस्कृतीला दर्शविणाऱ्या या गीताच्या बोलावर मनसोक्तपणे सर्व राज्यांतील लोक कलावंतांनी आपल्या लोककलेची ओळख करून दिली.लोककले चा वारसा तेवत ठेवण्याकरता नालंदा लोककला मंचचे प्रामाणिक आणि गडचिरोली येथील महेश वाढई,उद्देश कामिडवार , खोमेश बोबाटे, प्रणय मेडपल्लीवार ,मयूर चौधरी , कल्याणी शेडमाके,कृष्णाली पोटावी,लीना पटोडी ,दिव्या भोयर,प्रतीक्षा भोयर या सगळ्या कलावंतांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे.
लोक कलावंतांना राष्ट्रीय दर्जा मिळवून दिल्याबद्दल सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचं आम्ही सर्व कलावंत आभार व्यक्त करतो आहे. G-20 सारख्या स्तुत्य उपक्रमाला नालंदा लोक कला मंच च्या वतीने हार्दिक सदीच्छा व्यक्त करतो.गडचिरोली च्या मातीशी जुळलेल्या या लोक कलावंतांसाठी गडचिरोली वासियांच्या भरभरून सदिच्छा..