त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे, शाखा एटापल्ली,च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.

त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे, शाखा एटापल्ली,च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.


एस.के.24 तास


एटापल्ली : 9 मार्च 2023 रोजी गुरुवारला त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे, शाखा एटापल्ली, च्या वतीने मान.प्रज्ञा वाघमारे मॅडम व्यवस्थापक व श्री.मान प्रशांत वाघमारे राज्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी हायस्कूल इटापल्ली.येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजीव गांधी हायस्कूल चे मुख्याध्यापक मा.श्री.कोकुलवार सर व दिप प्रज्वलन माननीय.श्री.मंगल जी मशाखेत्री सर प्रभारी जिल्हा समन्वयक  शाखा एटापल्ली , राजीव गांधी हायस्कूल चे सर्व शिक्षक वृंदाच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमातून आजची स्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करीत आहेत. महीला करिता शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांची माहिती घेवून त्य योजनांचा लाभ घेतला पाहिजे . व आपल जिवन निर्भर बनवलं पाहिजे . आजच्या महिलांना सावित्री बाई फुले,मा साहेब जिजाऊ, रमाई,अहिल्यादेवी,इंदिरा गांधी,प्रतिभा ताई पाटील यांचं जीवन चारित्र्य समजून घेणे अत्यावश्यक आहे सोबतच कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देवुन त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.

या वेळी  फार कमी वेळात अतिसुंदर अस नियोजन राजीव गांधी हायस्कूल येथील कर्मचाऱ्यांनी व्यवस्था केली  या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे.शाखा एटापल्ली चे स्वयंसेवक मंगेश दुर्वा,रोशन मडावी,कौमोदिनी कुमरे,वनिता पुंगाटी,राहुल महा,रंजना महा,अर्पित करमरकर, सचिन कुंभारे यांनी प्रयत्न केले, व या कार्यक्रमाचे (सूत्रसंचालन) श्री.मारोती मट्टामी,तर आभार प्रदर्शन माननीय श्री मंगेश दुर्गा यांनी जिम्मेदारी सांभाळली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !