झाडीपट्टी रंगभूमीचे हरहुन्नरी रंगकर्मी प्रा.डाॅ. शेखर डोंगरे यांच्या षष्ट्यब्दीपुर्ती निमित्य झाडीपट्टी रंगभूमीचा नव्वोदत्तर " चिंतन आणि चिकित्सा" गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन २६ मार्च २०२३ला.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी :(अमरदीप लोखंडे) २३/०३/२३ साडेतीन दशकापासून झाडीपट्टी रंगभूमीवर हरहुन्नरी रंग कर्मी म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकार करून प्रेक्षक वर्गाच्या हृदयात ठसा उमटविणारे प्राध्या. डॉ. शेखर डोंगरे यांच्या षष्ट्यब्दीपुर्ती निमित्य त्यांच्या एकूण जीवनकार्याचा उजाळा देणारे आणि जागतिकीकरणाच्या नंतरच्या झाडीपट्टी रंगभूमीचा मागोवा घेणारा नवोदत्तर झाडीपट्टी रंगभूमी चिंतन आणि चिकित्सा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे.
सदर प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशन माननीय आमदार व माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते माननीय प्राचार्य डाॅ. श्याम मोहरकर जेष्ठ समिक्षक तथा रंगकर्मी यांच्या अध्यक्षतेखाली भाष्यकार डॉ. नीलकांत कुलसंगे माजी संचालक, गीत व नाट्य विभाग भारत सरकार , दिल्ली , मा. डॉ.श्रीराम कावळे, प्रभारी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,मा.नरेश गडेकर,अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई,मा.अनिरुद्ध वनकर प्रसिद्ध गायक व प्रबोधनकार अभिनेता व दिग्दर्शक, मा.देवेंद्र दोडके, प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेता,मा.डॉ. दुर्गेश रवंदे नाट्य अभ्यासक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
दिनांक २६ मार्च २०२३ रविवारला सकाळी ठीक १०-३० वाजता तुलसी लाॅन चंद्रपूर रोड,सिंदेवाही येथे पार पडणाऱ्या ग्रंथ प्रकाशन समारंभाला जास्तीत जास्त ग्रंथ प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.डॉ.शेखर डोंगरे गौरव ग्रंथ समिती सिंदेवाही यांनी केले आहे.