सर्वाचा विकास साधणारा,राज्याची वाटचाल प्रगती कडे नेणारा अर्थसंकल्प. - माजी आमदार सुदर्शन निमकर
एस.के.24 तास
चंद्रपूर : CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis देवेंद्र फडणविस Sudhir Mungantiwar सुधिर मुंगटीवार संत तुकाराम बिज यांच्या तत्वास अनुसरून अर्थसंकल्प सादर करताना सन्मान आपल्या युगपुरुषाचा ,ठेवू या आदर्श शिवरायांचा असा आशष व्यक्त करत अर्थमंत्र्यांनी सर्वाच्या हिताचा अर्थसंकल्पात सर्वसमावेशक घटकांना समाविष्ट केले.
शिंदे-फडणवीस सरकारने विधीमंडळात सादर केलेला व अर्थमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला सन 2023-24 चा अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असुन तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याने शाश्वत शेती, समुध्द शेतकरी, महिला, आदिवासी,मागासवर्ग ओबींसीसह सर्व समाजघटकांचा , रोजगार निर्मिती, सक्षम कुशल ,रोजगार सूक्ष्म ,पर्यावरण पुरक सर्वसमावेशक सर्वाचा विकास साधणारा राज्याची वाटचाल प्रगती कडे नेणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.या ध्येयाने प्रेरित व राज्याला प्रगती कडे ,नवी दिशा देणारा देत सर्वाच्या हितासाठी हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अँड संजय धोटे यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय, केवळ एकरुपयात शेतकऱ्यांनापिकविम्याचा लाभ, धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी 1 हजार कोटी, महामंडळामार्फत 10 हजार कोटी बिनव्याजी कर्ज, इतर मागासवर्गीयांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे, 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविणार,लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर 5000, पहीलीत 4000, सहावीत 6000, अकरावीत 8000 व अठरा वर्षानंतर 75 हजार सरकार देणार,अंगणवाडी सेविका मानधन 10 हजार रुपये मदतनिस 5 हजार 500 रुपये,
आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 3500 वरुन 5000 रुपये वाढ, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य अंतर्गत 5 लाखापर्यंत उपचाराची सोय, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार लाभार्थ्यांना 1 हजारावरुन 1500 रुपये वाढ केली, महिलांना एस टी प्रवासात 50 टक्के सुट, ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरांमध्ये विरंगुळा केंदाची स्थापना,आदिवासी पाडे, बंजारा तांडे,धनगर वाड्यामध्ये रस्त्यांसाठी 400 कोटीच्या तरतूदीने हा समाज विकासाकडे वाटचाल करेल.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ, वर्ग 5 वी ते 7 वी 1 हजार वरुन 5 हजार, 8 वी ते 10 वी 1500 वरुन 7500 याचबरोबर शिक्षणसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपयांची भरघोस वाढ, राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तसेच बालेवाडी पुणे येथे मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडुकरिता स्पोर्ट सायन्स सेंटरची उभारणी, अल्पसंख्यक महिलांसाठी 3 हजार बचत गट व कौशल्य विकास प्रशिक्षण व अन्य विविध क्षेत्रात विकास साधण्याची भुमिका अर्थसंकल्पातून पार पाडली आहे. सामाजिक, आरोग्य तसेच किडा क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारा निर्णय संतुलित व सर्वसमावेशी असून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहनपर निधी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना या अर्थसंकल्पातून माडल्या आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मच्छीमारांना 5 लाखाचा विमा, शेतकऱ्यांना शेततळी व मागेल त्याला शेडनेट हरितगृह यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास साधणारा असुन पायाभूत सुविधा व रोजगार निर्मिती, रोजगारक्षम युवा, पर्यावरण पुरक विकास साधणारा हा अर्थसंकल्प असुन महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला साजेसा असा हा अर्थसंकल्प असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी म्हटले आहे.