झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन संपन्न पद्मश्री डॉ.खुणे यांचा सत्कार. ★ झाडीपट्टीच्या रसिकांचे अनंत उपकार न विसरणारे - डॉ.परशुराम खुणे


झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन संपन्न पद्मश्री डॉ.खुणे यांचा सत्कार.


★ झाडीपट्टीच्या रसिकांचे अनंत उपकार न विसरणारे - डॉ.परशुराम खुणे 


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गोंडपिपरी : झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनाचे आयोजन खैरे कुणबी समाज भवनात करण्यात आले होते. उद्घाटन राजुरा नगरपरिषद चे माजी अध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी उद्धव नारनवरे होते तर सत्कारमूर्ती म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे (गुरनोली) उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चारूदत्त मेहरे (अकोला),  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , गोंडपिपरी च्या नगराध्यक्ष सौ. सविता कुळमेथे, प्राचार्य सौ. रत्नमाला भोयर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडीबोलीचे‌ जिल्हा प्रमुख  अरुण झगडकर यांनी केले. तर कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांनी आपल्या वृंदावन काव्यसंग्रहाच्या निर्मितीवर  प्रकाश टाकला.  


यावेळी या  काव्यसंग्रहाचे प्रकाशन  अतिथीच्या हस्ते करण्यात आले. वृंदावन अभंग काव्यसंग्रहात मानवी जीवनाविषयी चिंतन मांडले गेले आहे, असे चारूदत्त मेहरे म्हणाले तर संत विचारांना समर्पित असा  हा अभंग संग्रह असल्याचे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. अरूण धोटे यांनी झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. खुणे यांचा मंडळाचे वतीने  मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. झाडीपट्टी रंगभूमी च्या सेवेसाठी मिळालेला सन्मान मी तमाम  रसिकांना अर्पण करतो असे प्रतिपादन डॉ. खुणे यांनी केले.  


तसेच  तालुक्यातील उद्धव नारनवरे, गोंडपिपरी (नाट्यकर्मी),राजेश्वर  कोहपरे,वढोली (नाट्यकलावंत),पत्रुजी किसन सांगडे, धाबा (प्रवचनकार),झावरुजी  फुलझेले, बोरगाव (नाट्यकलावंत),ओमाजी  पिंपळकर, विठ्ठलवाडा (दंडार),दयानंद  सिडाम, गोंडपिपरी (नाट्यकलावंत) इत्यादी ज्येष्ठ  झाडीपट्टी लोक कलावंत पुरस्कार  प्रदान करण्यात आला. झाडी गौरव गीताचे गायन शाहिर नंदकिशोर मसराम (कुरंडी)यांनी केले  तर सूत्रसंचालन रत्नाकर चौधरी यांनी केले.दुसऱ्या सत्रात कवयित्री सौ. गायत्री शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.‌


या  कवी संमेलनात दिलीप पाटील, विनायक धानोरकर,अनिल आंबटकर,लक्ष्मण खोब्रागडे, संजीव बोरकर,उपेंद्र रोहणकर,डॉ.प्रविण किलनाके,संगीता बांबोळे, प्रीती जगझाप, सुनील बावणे,शीतल कर्णेवार,सुनील पोटे,मनीषा मडावी, संतोष मेश्राम,सरीता गव्हारे,छाया टिकले, संतोषकुमार उईके,प्रशांत भंडारे,देवानंद रामगिरकर,अरुणा जांभूळकर,प्रमिला हांडे, अक्षय उराडे,दिनकर सोनटक्के आदी कवींनी आपल्या स्वरचित रचना प्रस्तुत केल्यात. सूत्रसंचालन रामकृष्ण चनकापुरे यांनी केले.‌

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !