डॉ,शेखर डोंगरे हे निर्माता,दिग्दर्शक,प्राध्यापक, नट म्हणून ग्रंथातून सामोरे येतात गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा ‌: - डॉ.निलकांत कुलसंगेचे प्रतिपादन.

 


डॉ,शेखर डोंगरे हे निर्माता,दिग्दर्शक,प्राध्यापक, नट म्हणून ग्रंथातून सामोरे येतात गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा ‌: - डॉ.निलकांत कुलसंगेचे प्रतिपादन.


एस.के.24 तास


ब्रम्हपूरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,३०/०३/२३ " अभिनय करतांना काॅमेडी करणं अतिशय कठीण आहे.'हसणं' ही अभिनयाची क्रिया आहे आणि ती अभिनयाच्या विरोधात करावी लागते.'हास्य' हा विकार नाही ती प्रतिक्रिया आहे आणि अंगविक्षेप  करतांना ते अनैसर्गिक,विद्रूप, असुंदर वाटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.हा सगळा प्रकार डॉ शेखर डोंगरेंनी केला.ते वेगवेगळ्या भूमिकेत जगले म्हणून ते या गौरवग्रंथातून प्राध्यापक,निर्माता, दिग्दर्शक,नट म्हणून आपल्या सामोरे येतात. " असे प्रतिपादन गीत व नाटय विभाग भारत सरकार दिल्लीचे माजी संचालक डॉ. निलकांत कुलसंगेंनी केले.


     ते सिंदेवाही येथे रंगकर्मी प्रा डॉ शेखर डोंगरे यांच्या षष्टयब्दीपूर्ती निमित्त ' नव्वदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी: चिंतन आणि चिकित्सा ' या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यात भाष्यकार म्हणून बोलत होते.विचारपिठावर अध्यक्षस्थानी नाटयसमीक्षक प्राचार्य डॉ श्याम मोहरकर, माजी कॅबिनेट मंत्री आ.विजय वडेट्टीवार, डॉ नरेश गडेकर,अनिरुद्ध वनकर,देवेंद्र दोडके,डॉ,दुर्गेश रवंदे व गौरवमूर्ती प्रा डॉ शेखर डोंगरे,सौ प्रज्ञा डोंगरे उपस्थित होते. 


      कार्यक्रमाची सुरुवात सुगम संगीताने करण्यात आली.यानंतर आ.विजय वडेट्टीवारांच्या शुभ हस्ते प्राचार्य डॉ श्याम मोहरकर, डॉ राज मुसणे, डॉ जनबंधू मेश्राम, डॉ धनराज खानोरकर संपादित ' नव्वदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी: चिंतन आणि चिकित्सा ' या गौरवग्रंथाचे प्रकाशन पाहूण्यांच्या उपस्थित करण्यात आले.यानंतर  विनोदी कलावंत के.आत्माराम,सुरभी वैद्य, डॉ श्रृती डोंगरे,चैतन्य डोंगरे, प्राचार्य अमीर धमाणी  व पाहूण्यांची भाषणे झालीत. 


केक कापून डॉ डोंगरेंचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला गेला. मनोगतात आ.वडेट्टीवारांनी, झाडीपट्टी रंगभूमीला स्वतःच्या अस्तित्वाने उभे राहण्यासाठी अकेडमी आवश्यक असल्याचे म्हटले तर प्राचार्य डॉ श्याम मोहरकरांनी,हा गौरवग्रंथ झाडीपट्टी रंगभूमीचा चरित्रचित्र ग्रंथ आहे,असे अध्यक्षीय मनोगतात स्पष्ट केले.


      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजकुमार मुसणेंनी,प्रास्ताविक डॉ,जनबंधू मेश्रामांनी केले.सन्मानपत्राचे वाचन प्रा.धनश्री तायडेंनी केले तर आभार डॉ धनराज खानोरकरांनी मानले.कार्यक्रमाला अनेक मान्यवर नट, अभ्यासक,दिग्दर्शक,निर्माते, प्राध्यापक व श्रोते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !