राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आरोग्य जनजागृती अंतर्गत योगा प्रात्यक्षिक.

 


राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आरोग्य जनजागृती अंतर्गत योगा प्रात्यक्षिक.

 

एस.के.24 तास


राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली शारीरिक शिक्षण विभागच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती अंतर्गत योगा प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.दिवाकर उराडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक,प्रशांत वासाडे,प्रा. विनोद बडवाईक,डॉ. विजय पवार,प्रा.सगानंद बागडे,डॉ.रामचंद्र वासेकर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते योगा प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.


महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर,अशोक खोब्रागडे व  शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. भास्कर सुकारे यांच्या मार्गदर्शनात,रोशन तिवाडे प्रफुल निरुडवार,प्राध्यापिका,दीपिका गुरनुले यांनी योगा प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. 


यावेळी  विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल जनजागृती तसेच आयुष्यासाठी योगा व प्राणायाम यांच्या बद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर करून निरामय आयुष्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रफुल वैराळे,प्रा.महानंदा भाकरे किशोर बोरकर यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !