वाढत्या महागाईवर नियंत्रण करणे काळाची गरज. - समाजसेवक,पत्रकार संजीव भांबोरे
★ सिलेंडर गॅस,मोबाईल रिचार्ज,बेरोजगार,शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरता वेगळी तरतूद करा.
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्नतिनिधी,भंडारा
भंडारा : दिवसेंदिवस महंगाईमध्ये वाढ होत असून महंगाईवर नियंत्रण करण्याची काळाची गरज असल्याचे मत समाजसेवक, पत्रकार संजीव भांबोरे यांनी मीडियाशी बोलतांना केले. आज शासन नवनवीन घोषणा करताना दिसते. परंतु आज पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या महागाईच्या फटका सर्वसामान्य जनतेवर बसतो. त्यामुळे सर्वच वस्तूच्या किमती महाग होतात.
त्याचप्रमाणे सिलेंडरचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले असून या सिलेंडरच्या किमती अर्ध्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजेत. कारण ज्यांचे उत्पन्न करोडोच्या घरात आहेत अशा व्यक्तींना सुद्धा १२००/ रुपयाचा गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे फुटपाटचा व्यक्ती त्यांना सुद्धा बाराशे रुपयांचा सिलेंडर घ्यावा लागतो त्यामुळे ही विसमता म्हणावं की समानता ? त्यामुळे शासनाने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींकरता वेगळ्या गॅस सिलेंडरची कमी किमतीत व्यवस्था करून द्यायला पाहिजे. मोबाईल नेटच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला मोबाईलचा वापर करणे कठीण झालेले आहे .सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती महिन्याला ३००/ रुपयाचा रिचार्ज मारतो त्याचप्रमाणे या देशातील गर्भ श्रीमंत व्यक्ती सुद्धा 300 रुपयांच्या महिन्याकाठी रिचार्ज मारतो. त्यामुळे हे कुठली समानता? ह्या गरीब व्यक्तींना कमी किमतीत मोबाईल रिचार्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे तेव्हाच या देशातील विषमता दूर होईल.
शासनाने महिलांना बस भाडे मध्ये सरसकट 50 टक्के सूट दिलेली आहे ही महिलांच्या हिताची आहे. परंतु गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या महिला रोज या एसटी सवलतीचा फायदा घेऊ शकत नाही. जो कर्मचारी महिला वर्ग आहे त्या कर्मचाऱ्याला 50% सवलतीचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. जे पदवीधर बेरोजगार आहेत त्यांना नोकरी लागेपर्यंत शासनाने पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यायला पाहिजे.
त्याचप्रमाणे शेतीत राबराब राबणारा किसान वर्ग आहे त्या किसान वर्गाला प्रति महिना 5000 रुपये सानुग्रह मदत द्यायला पाहिजे .तरच या देशातील विषमता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
शेतीत मजूर करणारा मजूर हा २००/ रुपये रोज कमावतो आणि तोच नोकरदार वर्ग रोजचे २ ते ३ हजार रुपये एका दिवशी कमावतो याला काय म्हणावे? शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी समाजसेवक पत्रकार,संजीव भांबोरे यांनी केली आहे.