ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ मेंडकी येथे जागतिक महिला दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन.

ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ मेंडकी येथे जागतिक महिला दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१०/०३/२३

            दिनांक ०९ मार्च २०२३ ला ग्रामपंचायत मेंडकी सभागृहात ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

          'गावाकडे चला ' हा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. दरवर्षी महिला दिन शहरात,तालुक्याच्या ठिकाणी राजकीय, सामाजिक संघटना कडून साजरा केला जातो. पण गावात मात्र फार साजरा होत नाही म्हणूनच चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ने महिला काँग्रेस च्या प्रदेशअध्यक्षा,संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गर्शनाखाली जागतिक महिला दिन सप्ताह गावात साजरा करण्याचे ठरवले. 


मोठ्या मोठ्या शहरात अनेक महिलांचा मानसन्मान होतो पण गावातील कष्टकरी महिलांचा सन्मान झाला पाहिजे ही भावना या मागची होती.या 'महिला दिन सप्ताहाची सुरवात आज ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी या गावापासून सुरू करण्यात आली. महिला काँग्रेसचे संघटन गावातळी पर्यंत पोहचले पाहिजे या साठी हा प्रयत्न आहे.


यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ,राष्ट्रमाता इंदिरा गांधी,क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार,पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


          १९व्या शतकात भारतीय समाजात स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त होते.तिला त्या काळात अनेक अनिष्ट प्रथांचा सामना करावा लागत असे.सती प्रथा, केशवपन्न, बालविवाह, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला.त्या काळात अनेक कर्तबगार स्त्रियांनी पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकत आपली गुणवत्ता दाखवली.


त्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची व समाजातील अनिष्ट प्रथाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली.माता रमाई या साक्षात त्यागमूर्ती आहेत या भारतीय महान स्त्रिया आहेत ज्यांचे आदर्श संपूर्ण जगाने स्वीकारून स्त्रियाला दुय्यम नाहीतर प्रथम स्थानी पुरुष्यासोबतच सन्मान प्राप्त झाले पाहिजे.


      " आम्ही सावित्री- जिजाऊ च्या लेकी " या तत्वावर विज्ञान युगातील स्त्रियां या त्या काळातील अनिष्ट प्रथेपुढे जाऊन स्वतःचे अस्तित्व कश्याप्रकारे सिद्ध करते,स्त्रियांनी स्वावलंबी बनण्यासाठी व त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्देश होते.


कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव कु.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या हस्ते, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मंगलाताई लोनबले,जिल्हा परिषद माजी सदस्या स्मिताताई पारधी,मेंडकी ग्रामपंचायत सरपंचा सौ.मंगलाताई ईरपाते, ब्रम्हपुरी शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ योगिताताई आमले, माजी नगरसेविका जयाताई कन्नाके,मेंडकी ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री आंबोरकर, मेंडकी ग्रामपंचायत सदस्या सौ पुष्पाताई गभणे, मेंडकी ग्रामपंचायत सदस्या सौ.मोक्षालीताई शेंडे,मेंडकी ग्रामपंचायत सदस्या सौ विद्याताई चौधरी आदी मान्यवर उपस्थितीत संपन्न झाले.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले यांनी केले तर सूत्रसंचालन मेंडकी ग्राम महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती नयनाताई गुरनुले यांनी  तर आभार मेंडकी ग्राम काँग्रेस अध्यक्षा सौ.भावनाताई ईरपाते यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !