रावणवाडी ग्रामवण समितीचा उपक्रम ठरतो ग्रामस्थांचा आधार.

रावणवाडी  ग्रामवण समितीचा उपक्रम ठरतो ग्रामस्थांचा आधार.


एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) भंडारा जिल्ह्यातील खापा जंगल परिसरात डोंगर व तलाव  लगतच्या सौंदर्याने सुसज्ज असलेल्या पर्यटन स्थळी वसलेले रावणवाडी हे गाव या गावात मूलनिवासी म्हणून मोठया प्रमाणात गोंडी समाज आहे .शहरापासून दूर जंगली भागामध्ये राहणाऱ्या या गावकऱ्यांना रोजगाराची समस्या आहे जवळचं परिसर डोंगर, जंगल व तलावाच्या पाण्याने वेढलेले असल्याने  पुरेसा रोजगार नाहीं त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना जंगल साधन संपत्ती वर अवलंबून राहावं लागत त्यामूळे उदर्निरवाह करतांना आर्थिक अडचण निर्माण होते. अश्यावेळी गावातील ग्रामस्थांना आरोग्याविषयी समस्या निर्माण झाल्या तर अर्थबळ नसतो त्यामुळे कधी कधी मृतकाचा अंत्य संस्कार करताना सुधा आर्थिक समस्या निर्माण होतात.


म्हणून रावनवाडी जंगल बीट  अंतर्गत संयुक्त वण समिती व ग्रामस्थांनी गावातील कोणाच्या मृत्यु प्रसंगी अर्थसाहाय्य म्हणून पाच हजार रुपये रोख अर्थ सहाय्य देण्याचा उपक्रम सुरू केला. या स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी रावणवाडी वण बीट रक्षक तथा रावणवाडी संयुक्तं वण समिती सचिव ईश्वर काटेखाये तसेच रावणवाडी संयुक्तं  ग्रामवण समिती अध्यक्ष जगदीश उईके यांच्या नेतृत्वात सुरु आहे या उपक्रमाची जवळच्या परिसरात प्रशंसा केली जात आहे.


 नुकताच  रावणवाडी येथील,धृपत्ता बागडे या 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला त्यांचा मुलगा मारोती बागडे यांना अंत्य संस्कार करण्यासाठी रावणवाडी ग्रामवण समिती ने 5000 हजार रुपयाचे धनादेश देऊन बागडे परिवाराच्या दुःखात सहभागी झाले. त्यामूळे बागडे परिवाराला आर्थिक  मदतीचा  दिलासा मिळाला यावेळी ग्रामवण समिती अध्यक्ष जगदीश उके उपाध्यक्ष कार्तिक सिडाम,सचिव ईश्वर काटेखाये, समितीचे किर्तीलाल उईकें ,बंडूभाऊ कुथे, प्रकाश पंचबुद्धे, गजानन थोटे तसेच ग्रामवासी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !