राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत अंडवृद्धी          शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : राष्ट्रीय किटजन्य रोग  नियंत्रण कार्यक्रमातर्गत हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे दिनांक 16 मार्च ते 31 मार्च 2023 पर्यत  आयोजन करण्यात आले आहे. मा. संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे आदेशान्वये मोहिम स्वरुपात राज्यभरात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात 16 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान हत्त्तीरोग आणि अंडवृद्धी सर्वेक्षण यादीला अनुसरून दिनांक 15 मार्च 2023 रोजी अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


       सदर मोहिम यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आरोग्य उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय अंडवृद्धी रुग्णाची यादी तयार करून व वैद्यकीय अधीक्षक यांचे मार्फत तपासणी केल्यानंतर अंडवृद्धी शस्त्रक्रियेस पात्र रुग्णाची यादी तयार करण्यात आली असून जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अंडवृद्धी शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कोणतीही फी आकारली जाणार नसून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.अनिल रुडे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालनात हत्तीरोग निरीक्षक आढावा सभेत केले आहे.               

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !