तेंदुपत्ता बोनस मध्ये कर्कापली येथे गावकऱ्यांची फसवणूक.

तेंदुपत्ता बोनस मध्ये कर्कापली येथे गावकऱ्यांची फसवणूक.


एस.के.24 तास


चामोर्शी : मारोडा ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या मौजा कर्कापली येथे पेसा अंतर्गत तेंदूपत्ता बोनस वाटपात फसवणूक झाल्याची  तक्रार गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे दि.13/3/2023 रोजी नोंदवली आहे.


मौजा कर्कापली या तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दि.  5/5/2022 ते 16/5/2022 पर्यंत तेंदूपत्ता संकलन केले होते. कर्कापली येते तेंदूपत्ता संकलन केंद्रावर शेकडा 625 /- रुपये दर ठेवलेला होता.त्यानुसार पहिल्या टप्प्यात गावकऱ्यांना 400/- रुपये प्रमाणे रक्कम मिळाली होती व उर्वरित रक्कम 225 /- बोनसच्या स्वरूपात मिळणार होती. ती रक्कम देताना सरकारी रजिस्टर A1बुक मध्ये गावकऱ्यांचे कमी पुढे दाखवण्यात आले आणि A1 रजिस्टर मध्ये स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने हजारो पुढे चढवून बोनसचे उर्वरित रक्कम फळीमुंशिनी  उचल केली आहे.


 तसेच A1 रजिस्टर मध्ये अल्पवयीन मुलाच्या नावाने नामे आकाश राजू नरोटे वय 17 (वर्ष,) 500 पुढे चढवून  बाल गुन्हेगार कायद्याचा उल्लंघन केला आहे.फळीमुंशींनी गावकऱ्यांच्या पुड्याची अफरातफर करून पुड्याच्या संख्येनुसार बोनस न दिल्यामुळे गावकऱ्यांची फसवणूक केली आहे ,अशी माहिती चामोर्शी पोलीस स्टेशन येथे गावकऱ्यांनी दिली आहे. या फळीमुंशिवर लवकरात लवकर कारवाई करून गावकऱ्यांना न्याय व उर्वरित बोनस देण्यात यावा अशी मागणी सर्वत्र गावकरी करत आहेत.


फळी मुंशींच्या नात्यातील असलेल्या पुड्यांची संख्या.

नाव                    नातेसंबंध .   पुडे 

सुधाकर पुसू जुरे फळीमुंशी 6355

पुसू दलू जूरे       वडील.       2900

उमाजी पुसू जुरें.   भाऊ.       5280

विश्वनाथ केसरी जूरे  पुतण्या.   5045

शरद केसरी जूरे.     पुतण्या.   6225

मानकीबाई केसरी जुरे वहिनी.  5065

मुंगलीबाई उमाजी जूरे भावसून 5805

आकाश राजू नरोटे.                 500

 (अल्पवयीन मुलगा).               

 एकूण पुड्याची संख्या     31805*                   

वरील प्रकारे फळी मुनशींनी आपल्या नातेवाईकांच्या नावे अधिक बुडा दाखवून गावकऱ्यांचे पुढे कमी करून गावकऱ्यांची फसवणूक केली आहे अशी माहिती गावातील गावकरी

1) श्री,मुकेश रामजी जनबंधू मु.कर्कापली

2)श्री,सुमित बंडूची चीचघरे मु.कर्कापली

 3)श्री,मनोज आनंदराव साखरे मु.कर्कापली

4)श्री उमाकांत जनार्दन दुर्गे मु.कर्कापली


तसेच इतर गावकरी यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !