सायकल स्नेही मंडळाची विशेष साप्ताहिक रॅली संपन्न.


 सायकल स्नेही मंडळाची विशेष साप्ताहिक रॅली संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : सायकल स्नेही मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने  सायकल रॅली गडचिरोली ते पोटेगाव मार्गाने काढण्यात आली. या सायकल रॅलीत मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.विलास पारखी,प्रा.अविनाश गौरकर,प्रा.नरेंन्द्र पुसदेकर,प्राचार्य भांडेकर,प्रा.सोनवने, उपेन्द्र रोहणकर,श्री.विलास निंबोरकर प्रा.पुरुषोत्तम ठाकरे,आदी सायकल स्नेही सहभागी झाले होते.


 तर मागील आठवड्यात इंदिरा चौक ते आरमोरी मार्गाने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत प्रा.डॉ.पाटील,विलास पारखी,उपेंद्र रोहनकर, विलास निंबोरकर,उदय धकाते,मोहित दशमुखे,अरुण पालापवार,थनिश लोहकरे आदी सदस्य सहभागी झाले होते.सायकल स्नेही मंडळाच्या माध्यमातून 'सायकल चालवा, आरोग्यवान व्हा - प्रदूषण टाळा 'या पध्दतीने जनजागृती करण्यात येत आहे. यात सायकल स्नेही मंडळ यशस्वी झाले असून गेल्या चार वर्षापासून सदर मंडळ विविध उपक्रम राबवित  आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !