पवनी येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा. ; कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव.

पवनी येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा. ; कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव.


एस.के.24 तास


भंडारा : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील पवनी येथील गभने सेलिब्रेशन लॉन येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भरारी... नवे तंत्रज्ञान आणि लैंगिक समानतेची या कार्यक्रमाचे आयोजन(ता.5) करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला जवळपास दोन हजार महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. 


कार्यक्रमाचे उदघाटन सुमित्रा साखरकर पोलीस उपनिरीक्षक पवनी ,यांनी केले.उपस्थित महिलांना संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, महिलांनी स्वतः सक्षम होऊन स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष  निक्की जयश्री प्रेमानंद उपमहाव्यवस्थापक मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्या देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी तंत्रज्ञान आणि लैंगिक समानतेची भरारी घ्यावी असे मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  दीपाली बोरीकर गट समन्वयक समग्र शिक्षा गट साधन केंद्र पवनी यांनीही महिलांनी उंच शिखर गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे मार्गदर्शन केले तसेच प्रबोधनकार संजीवनी चौधरी यांनी नाट्यमय रूपाने महिलांना मार्गदर्शन केले.  


महिलांनी विविध खाद्य पदार्थ, सौन्दर्य प्रसाधने व ईतर गोष्टींचे एकूण 33 स्टॉल लावुन आर्थिक मिळकत मिळवली यामुळे कार्यक्रमाला खूप रंगत आली व इतर महिलांनी या स्टॉल चा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला डॉ. शंकर कैकाडे (तालुका आरोग्य अधिकारी येथे) यांच्या मार्फत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला नूतन कुर्झेकर (सभापती पंचायत समिती येथे), डॉ. विजया नंदूरकर सहायक कार्यकर्ते येथे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.  


कार्यक्रमाला उमेद महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोती अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, माविम - नवी दिशा लोकसंचालीत केंद्र, आरोग्य विभाग पवनी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प पवनी, लोकमत सखी मंच पवनी, समग्र शिक्षा अभियान पवनी या सर्वांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील  महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यामध्ये परिसरातील काही कर्तृत्ववान महिलांचे गुणगौरव करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे सर्व सहकारी व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !