देश सेवेत एन सी सी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान - राहुल लाखे.


 देश सेवेत एन सी सी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान - राहुल लाखे.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,२९/०३/२३ 

               शिस्त,नेतृत्व,साहस,चारित्र्य, निष्ठा, देशाप्रती देश भावना, देशासाठी निस्वार्थ भाव तरुण तरुणी यांच्या निर्माण व्हावी व चांगले नागरिक घडावेत यासाठी एन सी सी विद्यार्थ्यां  करीता शालेय, महाविद्यालांमध्ये एन सी सी सुरू केल्या गेली.आजच्या घडीला एन सी सी विद्यार्थ्यांचे देशाप्रती मोठे योगदान आहे.अनेक संधी उपलब्ध असून जिद्दीने पुढे जा.असे प्रतिपादन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय एन सी सी गर्ल्स युनिट तर्फे आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून राहुल लाखे ट्रॅफिक पोलिस यांनी केले. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  प्राचार्य डॉ.देवेश कांबळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रीमा कांबळे ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल ,डॉ. स्निग्धा कांबळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी, पत्रकार प्रशांत डांगे लेफ्टनंट प्रा.सरोज शिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी उत्कृष्ठ कॅडेट यांना विविध उपक्रमात सहभागी  प्रावीण्य प्राप्त यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन एनसीसी कॅडेट सी पी एल स्निग्धा सोंडवले तर आभार  सी पी एल तनुश्री पाटील  यांनी मानले या कार्यक्रमास एनसीसी विभागाच्या तिन्ही वर्षातील कॅडेट महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !