श्रीराम नवमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने गावात शांतता नांदावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालय अ-हेरनवरगाव येथे सहविचार सभेचे आयोजन.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : अ-हेरनवरगाव/ दि.२७/०३/२३ श्रीराम नवमी जन्मोत्सव व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय सुधाकरजी आंबोरे यांनी अ-हेरनवरगाव येथील कार्यरत तलाव देवस्थान, अध्यक्ष श्री रमेश ठेंगरे,श्रीराम मंदिर सेवा समिती, अध्यक्ष श्री सुभाष ठेंगरे,श्रीकृष्ण मंडळ अध्यक्ष, श्री घनश्याम सावजकर, सचिव वामन राऊत, सदस्य प्रकाश राऊत,श्री रामचंद्र मंडळाध्यक्ष श्री ब्रह्मदास सावजकर, सचिव राजेंद्र देवढगले,बहुउद्देशीय बौद्ध समाज मंडळ अध्यक्ष श्री ध्रृवा खोब्रागडे, सचिव संजय मेश्राम आणि पोलीस पाटील अतुल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
ग्रामपंचायत कार्यालय येथे सहविचार सभा घेतली. सभेला मार्गदर्शन करताना त्यांनी श्रीराम नवमी शोभा यात्रा व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने निघणारी मिरवणूक व होणारे कार्यक्रम शांतते पार पाडण्याचे व कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन व योग्य मार्गदर्शन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
या सहवीचार सभेत श्री सिद्धार्थ् लोखंडे , श्री अमरदीप लोखंडे,श्री संजय ढोरे, पोलीस विभाग कर्मचारी श्री एम.डी.भगत उपस्थित होते.सहविचार सभेचे आभार अ-हेर नवरगाव बीट पोलीस अधिकारी श्री अरुण पिसे यांनी उपस्थितांचे मानले..