चिंचोली(बुज.)येथे उर्स महोत्सव व जाहीर सत्कार सोहळा तसेच दुय्यम कव्वाली कार्यक्रम.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी :(अमरदिप लोखंडे) दिनांक,१९/०३/२३ अल्हाज हरजत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली(बुज.) येथे दि. 22मार्च2023 बुधवारला रात्रौ 8 वाजता अम्मासाहेबा व शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उर्स सोहळ्याप्रसंगी मा.ना.प्रफुलभाई पटेल सांसद राज्यसभा ,सौ. वर्षाताई प्रफुलभाई पटेल गोंदिया, सुधिरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर, अशोकभाऊ नेते खासदार चिमूर-गडचिरोली श्रेत्र,विजयभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्र, राजकुमार बडोले माजी मंत्री, किष्णाभाऊ गजभे आमदार आरमोरी विधानसभा श्रेत्र, बंटी भाऊ भांगडीया आमदार चिमूर, किशोर जोरगेरवार आमदार चंद्रपूर,मनोहर चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी मो. राजेंद्रजी जैन गोदिया,शिवानीताई वडेट्टीवार प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी, सुरेश पटेल उघोगपती,ऐतेश्याम अली माजी नगराध्यक्ष वरोरा, सौ. रिताताई उराडे नगराध्यक्ष ब्रम्हपुरी, जेसाभाऊ मोटवाणी माजी नगराध्यक्ष वडसा, मिलींद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्राम्हपुरी, संदीप भस्मे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, तुषारभाऊ सोम,विनोद संकत,रफिक खान, राजकुमार निकम शिक्षणाधिकारी गडचिरोली,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उर्स महोत्सव निमित्ताने दरबारात जाहीर सत्कार रामा राजीराम पाचपांडे प्राचार्य हितकारणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, गोवर्धन श्रावणजी दोनाडकर पत्रकार देशोन्नती तथा सचिव तालुका पत्रकार संघ ब्रह्मपुरी ,अनिल नेरलवार पोलीस उपनिरीक्षक सिदेवाही, सुरेश रेवतकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुरुड व व पाल्य पुरस्कार कुणाल सेदरे,कु. अलिपशा तुषार सोम, तब्बसून बिसमिल्लाखा पठाण,कु. आयशा बाबर अन्सारी, मो. रियान बाबर अन्सारी, कु.समिक्षा कवडूजी गुरू, मनिष सदाशिव राठोर, मोहम्मद जैद मोहम्मद गालिब शेख, पूजा वटे नागपूर यांचा जाहीर सत्कार होणार आहे.
तसेच दुय्यम कव्वालीचाशानदार मुकाबला कव्वाल समीर ह्यात निझामी दिल्ली व कव्वाल आतिष मुराद टीव्ही कँशेट सिंगर बेंलॉर याना शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तरी समस्त जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष मोहनजी गिरी ,सचिव अरविंद जयस्वाल मुंतजेमा उर्स कमेटी चिंचोली(बु.) व अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबालशहा बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती ,व सार्वजनिक मंडळ चिंचोली (बुज) ब्रह्मपुरी यांनी केले आहे.