ग्राम पंचायत नवेगाव पांडव येथे महिला जागतिक दिनानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
एस.के.24 तास
नागभीड : सकाळी,७ वाजता ३०० मुलींची मेरेथान स्पर्धा घेण्यात आली .मेरेथान स्पर्धेचे उद्घाटन मान. श्रीमंती शारदाताई वासुदेव नवघडे यांच्या हस्ते रिबीन कापून व हिरवी झेंडी दाखवून करण्यात उद्घाटन करण्यात आले. तर शारदा ताई नवघडे यांच्या कडून १ ला, २ रा, ३ रा, क्रमांक ला रोख रक्कम सुध्दा देण्यात आले.
ग्रामपंचायत कडून मेडल देऊन विजेतांना गवरौण्यांत आले विजयजी बोरकुटे माजी उपसभापती पं.स. नागभिड तथा विद्यमान उपसरपंच नवेगाव पांडव यांच्या हस्ते व अँड. शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले . उपस्थित डॉ. वंजारी मॅडम, डॉ. प्रशांत पांडव.एम पी डब्लु बनकर सर , प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, ने.ही.विद्यालयाचे चुऱ्हे सर, कुथे सर, माने मॅडम , नवघडे मेडम हे उपस्थित होते.संपुर्ण एन. सि.सि. गृप ने.ही विद्यालय नवेगाव पांडव मेरेथान स्पर्धेचे मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ठिक,ठिकाणी उपस्थित होते.
संपूर्ण आरोग्य केंद्राचे कर्मचारी,सचिन गजपुरे अँब्युलन्स चालक अँब्युलन्स घेऊन उपस्थित होते.त्यानंतर ९ ते १२ आरोग्य तपासणी व उपचार डॉ.प्रशांत पांडव व खोब्रागडे सिस्टर, m.p.w बनकर सर व अभिजित चौधरी सिकलसेल , प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव,१२ ते १ योगा शिबिर डॉ. मुळे सर अड्याळ टेकडी यांनी घेतले डॉ.मुळे यांनी खुप चांगले पध्दतीने योगा चे महत्व पटवून दिले योगासनाने व्यक्ती कसा सुद्रुळ राहु शकतो हे पटवून दिले.
१ वाजता मार्गदर्शन व संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मुल़ींनी आपल्या कलाकौशल्य च्या माध्यमातून मुली मुलांपेक्षा कुठेही मागे नाही हे सिद्ध करून दाखवले पटनाट्याच्या माध्यमातून, दाखवले की मुलीच्या जन्माने जे लोक दुख्खी होतात एका मागे एक उत्तम असं मुलींनी आपले परफार्मस च्या माध्यमातून कला कौसल्या सिध्द केले.
मार्गदर्शन राजश्री झाडे मॅडम जे. इ. नगरपरिषद नगभीड. यांनी आपल्या मार्गदर्शनातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केव्हा व केव्हा पासून सुरु झाला, हिंदू कोडबिल द्वारे आपल्याला हक्क व अधिकार कसे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्राप्त करून दिले आणि संविधान किती महत्वाचा आहे अतीशय मोलाचे मार्गदर्शन केले. नावघडे मॅडम ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव यांनी स्त्री ही स्त्रीचाच कसा छळ करते हे पटवून दिले विधवा झाल्यावर कसे तिला बोलतात.
व पदोपदी कसा तिला हिनवले जाते व आपण कसे ह्या सर्व गोष्टीना न जुमानता कसे सामोर जायला पाहिजे हे त्यांनी आपल्या अनुभवाचा उदाहरण देऊन अतीशय मार्मिक पध्दतीने पटवून दिले.. डॉ.प्रशांत पांडव यांनी क्षयरोग व रक्ताची कमतरता कशी भरुन काढण्यासाठी यावर खूप चांगले मार्गदर्शन केले.डॉ कु.वंजारी मॅडम यांनी स्त्रियां ना वेशन त्यांचे परिणाम शरिराला कसे हानीकारक होतात हे पटवून दिले व वेशनामुळे कसे आजार होतात व आपण आपली काळजी कशी घ्यावी.असे सविस्तर मर्दशन केले.
तर अँड.शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी स्त्रियांना उपदेशून मॅरेथॉन काय असते व मुलींना शिकू द्या व आपल्या पायावर उभे राहण्याचा बळ द्या ह्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाही .मुलीचं समोर येत आहेत प्रत्येक क्षेत्रात. मुलींनो आदर्श कोणत्या देव्यांचा घ्यावा हे पटवून दिले , आदर्श जिजाऊ मातेचा, क्रांतीज्योती सावित्रीमाई चा अहिल्याबाई होळकरचा,रमाई मातेचा, नाही की फिल्मी दुनियेच्या स्त्रीयांचा.ज्यांनी समाजासाठी आपले सर्व जिवन झोकून दिलं अशा स्त्रियांचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे.
मुलींनो छान शिक्षण घ्या आपल भविष्य उज्वल करा आईवडीलांचे नाव रोशन करा मोठ्या वडीलधाऱ्या लोकांना मान सन्मान द्या. सूत्रसंचालन मान.कु.पि.पि.रामटेके ग्रामविकास अधिकारी नवेगाव पांडव यांनी दमदार सुत्र संचालन केले,आपल्या शायरी च्या माध्यमातून खूप छान केल .सौ.निरंजना सोनटक्के ग्रामपंचायत सदस्य नवेगाव पांडव,तसेच वैशाली बोबाटे व जयमाला पांडव आशा वर्कर्स, पुषा मेश्राम, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
तसेच व मोठ्या संख्येने मुली.व मुल गावातील प्रतिष्ठित महिला उपस्थितीत होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विजय श्रीराम नवघडे ,श्री.अतुल दादाजी पांडव कर्मचारी ग्रामपंचायत नवेगाव पांडव यांनी खुप परिश्रम घेतले, गांवातील मुलींनी सुध्दा खुप परिश्रम घेतले कार्यक्रम, शिवसैनिक, क्रीडा मंडळ, यांनी सुध्दा सहकार्य केले. यशस्वी करण्यासाठी,३००, मेडल्स वाटण्यात आले.मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला.