सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करा. - नागरिकांची मागणी
★ सबंधित विभाग सुस्त नागरिक त्रस्त.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : मोहाडी तालुक्यातील सतोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्डे पडल्याने वाटसरू ,सायकल स्वार आणि दुचाकी व चारचाकी वाहनधारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना त्रास दायक ठरत असल्याची दस्तुरखुद्द प्रवाशी नागरिकांची मोठी ओरड असून शासन प्रशासनाच्या अधिनस्त सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा एक विशेष बाब म्हणून सातो ना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी सातोणा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्यावरून हरदोली,आंधळगाव,मोहाडी,पांढराबोडी,धुसाळा ,कांद्री,रामटेक कडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक,प्रवाशांची तसेच दुचाकी ,चारचाकी वाहन धारकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्या वरील डांबर उखडून रस्त्यावर खड्डे पडल्याने वाटसरू,सायकल स्वार आणि दुचाकी व चारचाकी वाहनधारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून.
यामुळे एखादा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून एखादा अपघात झाल्यावर सदर रस्त्याचे डांबरीकरण करणार काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून या रस्त्याला कडे सबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सातोना परिसरातील सुजाण नागरिकांनी खंत,नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या मध्ये तीव्र असंतोष पसरला आहे व भविष्यात या असंतोषा चा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची नैतिक जबाबदारी असातांना सबंधित विभागाचे सदर रस्त्याकडे हेतू पूर स्पर अक्षम्य दुर्लक्ष होत असून सबंधित विभाग सुस्त व नागरिक प्रवाशी त्रस्त असे निर्माण झाले आहे.
सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? सदर रस्त्याच्या नादुरुस्ती मुळे एखादा अपघात होऊन जीवित व वित्त हानी झाल्यास यास जबाबदार कोण राहणार? सदर रस्त्याचे विहित कालावधीच्या आत डांबरीकरण करणार किंवा कसे? यास जबाबदार कोण ? आदी प्रश्न नागरिक,प्रवाशांनी उपस्थित केले आहेत.
याप्रकरणी शासन प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा प्रत्यक्ष मोका पाहणी सह सर्वेक्षण करून एक विशेष बाब म्हणून सातोना ते नेरी रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून नागरिक,प्रवाशांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.