होळीत झाडे तोडण्यापेक्षा शेनी गोवर्यांचा वापर करण्याचे आवाहन. - ईश्वर काटेखाये


होळीत झाडे  तोडण्यापेक्षा शेनी  गोवर्यांचा वापर करण्याचे  आवाहन. - ईश्वर काटेखाये


 नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : भारतीय सांस्कृतिक परंपरेत होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  हलाखीच्या बाजारात रंगीत तयारी दिसून येत आहे.  गाठी, रंगीबेरंगी पिचकाऱ्या, गुलालाने ठिकठिकाणी दुकाने सजवली जात आहेत.  मात्र दरवर्षीप्रमाणे शहरात लाकडाचा तुटवडा आहे.  मात्र होळीसाठी लाकडे गोळा करण्याचे काम प्रत्येक वस्तीत सुरू आहे.रात्री अनेक युवक विविध तयारी करत आहेत.


भंडारा जवळील पर्यटन स्थळ वनसंयुक्त समितीचे सचिव ईश्वर काटेखाये व रावणवाडी वनरक्षक कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, पूर्वीप्रमाणेच ग्रामीण भागात लोक होळी साजरी करतात,मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षतोडीवर बंदी घातली आहे. जनजागृती कार्यक्रम, लोकांमध्ये झाडे तोडू नये यासाठी जनजागृती केली जात आहे.  


ईश्वर काटेखाये यांनी झाडे तोडू नका व अधिकाधिक  गोबर गंडे चा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.वनहक संयुक्त समितीचे अध्यक्ष जगदीश उईके म्हणाले की, प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे लोक आता पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक होत आहेत.त्यावर होळी  पेटविली जायची,आता तसे होत नाही,मोठ्या प्रमाणात वृक्ष  तोड करून  होळी पेटवली जात असे , मात्र आता जनता सहकार्य करत असल्याचा संदेश संयुक्त वन हक्क समितीचे उपाध्यक्ष कार्तिक सिडाम यांनी दिला. 


पर्यावरणाचे रक्षण्यासंबंधात प्रकाश पंचबुद्धे म्हणाले की, मोबाईलच्या जमान्यात लोक पूर्वीसारखे सण साजरे करत नाहीत, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याची गरज आहे.म्हणून जनतेने वृक्ष तोडीवर आळा घालून पर्यावरण संरक्षणासाठी पुढें येऊन पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असे विचार व्यक्त केले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !