येरगांव जि.प.शाळेची विद्यार्थिनी जानवी विनोद जुवारे हिची " शाळेबाहेरची शाळा उपक्रमाच्या " मुलाखती करीता निवड.

येरगांव जि.प.शाळेची विद्यार्थिनी जानवी विनोद जुवारे हिची " शाळेबाहेरची शाळा उपक्रमाच्या " मुलाखती करीता निवड.


 एस.के.24 तास


मुल : शाळेबाहेरची शाळा उपक्रम विभागीय आयुक्त,नागपूर आणि प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाणे राबवित आहेत. हा कार्यक्रम दर मंगळवार,गुरुवार आणि शनिवारला घेण्यात येत आहे. शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्या करिता राबविला जात आहे. 


सकाळी १०.३० वा. आकाशवाणी नागपूर अ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जातो.जानवी विनोद जुवारे वर्ग ८ वा जि.प.उच्च प्राथमिक शाळा,येरगाव तालुका मूल जिल्हा चंद्रपूर या विद्यार्थिनीची ४२९ व्या भागा करिता शाळे बाहेरची शाळा  उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे.हा कार्यक्रम ०९/०३/२३ रोजी गुरुवारला नागपूर आकाशवाणी वरून प्रसारित करण्यात येईल.


गटशिक्षणाधिकारी,वैभव खांडरे,यांच्या प्रोत्साहनामुळे जि. प.उच्च प्राथमिक शाळा येरगावाला  हा बहुमान मिळाला आहे. गजेंद्र कोपुलावार केंद्र प्रमुख,भेजगाव,आनन्द गोंगले विषयतज्ञ बी.आर.सीमूल आणि वर्गशिक्षक राजेंद्र नंदीग्रामवार मुख्याध्यापक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शिक्षकवृंद आईवडील व गावकरी यांनी कौतुक केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !