शाहिद बाबूराव शेडमाके स्मरणार्थ सहकारी पतसंस्थेची शुभारंभ.
★ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,संतोष सिंह रावत, राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष,महेश पानसे यांचे उपस्थितीत उद्घाटन.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
चंद्रपूर : मुल तालुक्यातील मारोडा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला व उद्योजक यांचा आर्थिक व्यवहार सुकर करण्यासाठी व विशेष करुन बचतगटांना अधिकाधिक लाभ मिळवून स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून शहिद बाबूराव शेडमाके शेडमाके जयंतीचे शुभपर्वावर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.चे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे हस्ते प्रा.महेश पानसे यांचे विशेष उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश जगताप यांनी केले.कार्यक़माचे अध्यक्ष, स्थानी मारोडा चे सरपंच भिकारूजी शेंडे होते.या उद्घाटन कार्यक्रमानिमित्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी विविध योजना शेकडो उपस्थित महिला व शेतकरी,शेतमजूर यांना समजावून जिल्हा बँक तफै १ लक्ष रूपयांचे खाते देण्याची घोषणा केली. प़ा.महेश पानसे यांनी पतसंस्थेची उपयुक्तता व संचालक मंडळ व ग्राहकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. यावेळी मंचावर काटवण चे सरपंचा वंदनाताई पेंदोर, सदस्य किशोर गभणे, ग्रा.प.सदस्या मिनाक्षी मुरस्कर, अरूणा दुपारे उपस्थित होते.
संचालक मंडळाचे अध्यक्ष रविशंकर उईके, उपाध्यक्ष अविनाश जगताप,सचिव नंदादीप मडावी, संचालक लोकनाथ नर्मलवार,विनोद शेटे,संतोष सोनवाणे,यशवंत मरसकोल्हे, देवराव हणवते,सत्यशाही वल्के,रमेश मुरस्कर,शिल्पा उईके,वैभव घाटे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करुन पतसंस्था सुरू करण्यामागची प्रामाणिक भूमिका विषद केली.या कार्यक्रमाचे सुंदर संचालन शिल्पा उईके यांनी आभार प्रदर्शन सत्यशाही वलके यांनी केले.