श्री.संताजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस संपन्न.
एस.के.24 तास
भंडारा (नरेंद्र मेश्राम) : श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय ,पालांदूर येथे ८ मार्च "जागतिक महिला दिन "साजरा करण्यात आला शारदा माता आणि सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमांच्या पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गिरीश लांजेवार होते तर प्रमुख वक्ते म्हणून आरतीताई धकाते मुख्याध्यापिका सेवानिवृत्त सरस्वती विद्यालय, पालांदूर ह्या होत्या तर अतिथी म्हणून डॉ. संजयकुमार निंबेकर प्रा. रेश्मा खंडाईत उपस्थित होते. महिलांची आजची स्थिती आणि तिचे बदलते स्वरूप कसे असावे यासंदर्भात प्रास्ताविकातून रेश्मा खंडाईत यांनी मार्गदर्शन केले.
तर आजच्या स्त्री पुढील आव्हाने आणि ते पूर्ण करण्यास आपल्याला सक्षम करण्यासाठी कोणते उपाय योजावे लागतील त्याकरिता स्त्रियांच्या पुढील असणारी आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आरती धकाते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला सर्व उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला. महाविद्यालयातील डॉ.राजेंद्र खंडाईत,डॉ.रमेश बागडे प्रा.नितीन थूल,मनोज मोहतूरे, प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी लुटे तर आभार प्रदर्शन कु.कांचन बहेकार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जया कोडापे,कोमल शिंगणजुडे,सुबोध झलके, तुषार सोनवणे, वैष्णवी बागडकर,रीना लांजेवार, कल्याणी कोरे,निकिता हटवार यांनी अथक परिश्रम घेतले महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.