शेतीला जोड व्यवसाय करा : आ.नाना पटोले
★ तालुकास्तरीय पशुपक्षी व शेतकरी मेळावा.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम - जि.प्र.) भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशामध्ये बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. शेती हा देशातील शेतकरी वर्गाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणजेच जोड व्यवसाय करा. या मध्ये कुक्कुटपालन,मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय असे बरेचसे व्यवसाय आहेत की जे उत्पन्न जास्त देउ शकतात. हे व्यवसाय शेतकऱ्यांना आधार देणारे व्यवसाय आहे. असे प्रतिपादन आ. नाना पटोले यांनी केले.
ते आयोजित लाखांदुर तालुक्यातील मोहरणा येथे ११मार्च रोजी ला तालुकस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
या कार्यक्रमाला जी.प.अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, समाज कल्याण सभापती मदन रामटेके, डॉ .सुरेश ब्राह्मणकर, नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, जि. प .सदस्य विशाखा माटे, रशिका रंगारी, पंचायत समिती सभापती संजना वरकड़े, सहाय्यक खंड विकास अधिकारी खूने, माजी जी.प.सदस्य प्रदीप बुराडे, माजी जी.प.सदस्य प्रणाली ठाकरे, पंचायत समिती गटनेते मंगेश राऊत, पं . स . सदस्य जितेंद्र पारधी, छबु दिवटे . पुरुषोत्तम ठाकरे . मनोज भुरले .शाखा अभियंता अतकरे . भंडाऱ्याचे पशुसंवर्धन उपायुक्त वंजारी, सरपंच नीलेश बोरकर, कांग्रेस तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर, लेखराम ठाकरे, नगरपंचायत गटनेते बबलू नागमोती, भं . जि .यु महासचिव सुभाष खिलवानी, तालुका काँग्रेस युवक अध्यक्ष प्रकाश देशमुख . बबलू राऊत, नगरसेवक गोलू सुखदेवे, कांग्रेस महिला तालुकाध्यक्ष वर्षा मेंढे, नगरसेविका वैशाली बगमारे, लोभा शीलार, निशा बगमारे, सुचिता आगासे, सुभाष राऊत, कृषिपर्यवेक्षक राऊत, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या भागात जास्त प्रमाणात शेतकरी आहेत. धान पिक हा प्रमुख पिक आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय हा परवडेनासा झाला आहे. आणखी या सरकारने शेतकऱ्यांना संकटात टाकलेले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करून एकप्रकारे धान उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. प्रति क्विंटल ३७५ रुपये एवढे तुटपुंजे बोनस शेतकऱ्यांना मिळल्याने बोनसच्या नावावर ही चक्क शेतकऱ्यांची थट्टाच केलि. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोड़ व्यवसाय म्हणून मतस्य पालन, कुकुट पालन ,दुग्ध व्यवसाय करावा. बहुतांश गरिब कुटुंबासाठी दुग्ध व्यवसाय हा उत्पन्नाचा दुसरा साधन बनला आहे. रोजगार आणि उत्पन्नाचे साधन व्यावसायिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनलेली आहे. दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण भागासाठी नाही तर जगभरातिल कोट्यावधी लोकांना उपजीविकेचे साधन देतो.असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध नंदागवळी यांनी केले तर संचालन मोरेश्वर रधये यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकेश कुरंजेकर यांनी मानले .
या वेळी सावरगाव येथील अण्णाजी पारधी व राधेश्याम ढोरे यांचा चुलबंद नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने दोन व्यक्ती चा अपघातात मृत्यू झाले होते.तर त्यांच्या निवासस्थानी जावून जाऊन सात्वन भेट म्हणून आमदार,नानाभाऊ पटोले यांनी दिली .