झाडीपट्टीतल्या उमद्या कलावंतांनी माणसे वाचावी प्रकट मुलाखत. - पद्मश्री डॉ,परशुराम खुणे.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे)दिनांक, २९/०३/२३ " मला विनोद भूमिकेची ओढ होती.मी नवरगाव येथील परमानंद पाटील बोरकरांच्या रंगमंचावर घडलो.आजपर्यंत पाचशे नाटकांमधून आठ हजार भूमिका साकारल्या.'एकच प्याला' मधला तळीराम जास्त भावला.शासनाने पद्मश्री देवून माझ्या झाडीपट्टीला व मला अमर केले.हा पुरस्कार मी रसिकांना अर्पण करतो.आमच्या झाडीपट्टी रंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे.येथील नविन कलाकारांनी मात्र आपल्या झाडीपट्यातली माणसे वाचणे शिकावे " असा मोलाचा सल्ला पद्मश्री डॉ,परशुराम खुणेंनी दिला.
ब्रह्मपुरी येथील ने.हि.महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकरांनी त्यांना विविध प्रश्न विचारून बोलके केले.या प्रश्नांना डॉ खुणेनी आपल्या शैलीदार भाषेत उत्तर दिले.येथील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात चंद्रपूर ग्रंथोत्सव २०२२- २३ साजरा होत आहे.
उद्घाटन सत्रानंतर प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. कवी डॉ धनराज खानोरकरांनी तब्बल एक तास प्रकट मुलाखत घेतल्यानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारले.शेवटी 'एकच प्याला'तील मदिरा मंडळातील तळीराम अभिनयातून उभा केला.यावेळी झाडीपट्टीतील गायक नट युवराज प्रधान यांनी मनोगत व गीत सादर केले.
संचालन व आभार स्वप्निल मेश्रामांनी केले.यावेळी अनेक मान्यवर कवी,लेखक, रसिक उपस्थित होते.