गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.


एस.के.24 तास


गडचिरोली : युवकाने सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आष्टी नजीकच्या जयरामपुर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.वैभव सदानंद दिवसे (23) असे मृतकाचे नाव आहे.


जयरामपूर येथील शेतकरी वासुदेव भाऊजी दिवसे हे दुपारी 3 वाजताच्या सुमारास आपल्या शेताकडे गेले असता त्यांना शेतातील एका सागाच्या झाडाला वैभव दिवसे हा दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. 


याबाबतची माहिती वासुदेव दिवसे यांनी घरी जावून वैभवच्या कुटुंबीयांना दिली.कुटुंबीयांना घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती आष्टी पोलिस स्टेशनला देण्यात आली.पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !