अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : दिनांक,०९/०३/२३ शहरामधील कॉलेज रोडवरील लक्ष्मीनारायण मंदीर जवळ पीडीत तरुणीचे हतोडीने खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ब्रम्हपूरी पोलीसांनी पकडून गजाआड केले. त्याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, दि. 08/03/23 रोजी दुपारी 02.00 वाजे दरम्यान यातील पीडीत मुलगी ही आपले आईसह ब्रम्हपूरी वरून बोंडेगाव कडे जात असतांना कॉलेज समोरील लक्ष्मीनारायण मंदीर जवळ आरोपी नामे लवेश वामन देउळकर रा. नान्होरी याने आपल्याजवळील हातोडीने जिव घेण्याच्या इराद्याने तीचे डोक्यावर वार करून जखमी केले. जवळपास उभे असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत त्यास ताब्यात घेऊन ठेवले व पोलीसांना याबाबत माहीती दिली. ब्रम्हपूरी पोलीस ठाण्याचे पोहवा. सचिन बारसागडे हे त्याच भागात असल्याने त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.
पीडीत मुलीचे वैदयकिय उपचारानंतर तिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली कि. यातील आरोपी हा तीचे आईचा मानलेला भाऊ असून तीला वेगवेगळ्या नंबरवरून वांरवार फोन करून त्रास देऊन लग्नाची मागणी घालत होता.
परंतू तीची आई त्याला भाऊ मानत असल्याने तीने नकार देऊन फोन न करण्याबाबत वारंवार बजावले होते. त्यामूळे त्या रागातून त्याने तीचेवर जिवघेणा हल्ला केलेला होता. पीडीत मूलीचे तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम 307, 354 (ड) भा.दं.वि. सह कलम 3 (2) (v) अ.जा.अ.ज.अ.प्र.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. मल्लीकार्जून इंगळे सा. उपविपोअ कार्या. मूल अति. कार्य. ब्रम्हपूरी करीत आहेत.