प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांची टमाटरची बाग वादळात क्षतिग्रस्त.
शेतकरी चिंतातुर व आर्थिक संकटात ; अवकाळी पाऊस गारपीट चा तडाखा.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) १९ मार्च २०२३ रोजी बरसलेल्या अवकाळी वादळी पाऊस व
गारपीटच्या तडाख्यामुळे मोहाडी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांच्या शेतातील टमाटर पिकाची संपूर्ण बाग जमिनीवर कोसळून क्षतिग्रस्त झाली असून लाखो रुपयांचा फटका बसला असून ते आर्थिक संकटात सापडल्याने चिंतातुर,हतबल, हताश व वैफल्य ग्रस्त झाले आहेत आता वादळात क्षतीग्रस्त झालेल्या टमाटर पिकाला जीवदान कसे द्यावे असा प्रश्न आवा सून उभा ठाकला.
असून त्यांची केविलवाणी स्थिती झाली असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून वादळात नुकसान झालेल्या टमाटर पिकाची प्रत्यक्ष मोका पाहणीसह पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मोहाडी तालुक्यातील हरदोली (झंझाड) येथील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांनी नोकरीची वाट न बघता कृषी विषयक आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान अवगत करून शेतात विविध प्रयोग करण्याचा आणि त्यातून भरपूर उत्पादन घेण्याचा कृती संकल्प केला असून ते शेतात विविध वाणाच्या पिकांची लागवड करून शेती करतात.
मागील काही वर्षात शेतात भेंडी,लवकी,मिरची पिकांची लागवड करून योग्य मशागत केली आणि भरपूर उत्पादन घेतले त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला विदेशात मागणी आहे.त्यामुळे यावर्षी शेतात टमाटर या पिकाची लागवड केली पिकाची वाढ चांगली व्हावी यासाठी सिंचन व खताची मात्रा, निंदन,तसेच बांबूच्या साहाय्याने पिकाच्या वाढीसाठी आधार दिला.पीक चांगले होती आणि टमाटर ही लागले होते.
परंतु १८ व १९ मार्च २०२३ रोजी निसर्गाच्या अवकृपेमुळे मेघगर्जनेसह अवकाळी वादळी पाऊस व गारपीट चा वर्षाव झाल्याने वादळाने टमाटर चे उभे असलेले पीक शेतात जमिनीवर कोसळून क्षतिग्रस्त झाले आहे.त्यामुळे आता लागवडीचा खर्च ही निघणे कठीण झाले असून सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून केविलवाणी स्थिती झाली असल्याने ते चिंतातुर, हतबल, हताश व वैफल्य ग्रस्त झाले असून आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागली आहे.
या प्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांच्या शेतातील टमाटर पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष मोका पाहणी सह पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी आहे.