भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभ घ्यावा. - सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभ घ्यावा. - सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर


 नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी


भंडारा : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिक उत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आधी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे शासन निर्णय दिनांक 13 जून 2018 च्या सुधारित तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ११ वी १२ वी तसेच इयत्ता १२वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर विविध महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा या योजनेच्या लाभ घेण्यासाठी इयत्ता १०वी / १२वी पदवी/ पदविका परीक्षेमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. 



या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल दिव्यांग (अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करणे असे आव्हान डॉ.सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !