महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) येथे सायकल खरेदीचे धनादेश वितरण.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,११/०३/२३ शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत मुलींना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सायकलचे वाटप केल्या जाते.या योजने अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) येथे वर्ग आठ च्या चार विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी 1500/- रुपयाचा धनादेश वाटप श्री जी.के.मस्के,श्री सचिन एन.क-हाडे, पुरी,घ्यार,महल्ले सेडमाके,आर.एन.क-हाडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
धनादेश स्वीकारणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव फुलले होते त्यांनी शक्य तेवढ्या लवकर सायकल खरेदी करून रोज शाळेमध्ये नियमित सायकलने जाण्याचा निर्धार याप्रसंगी बोलून दाखविला आणि चांगला अभ्यास करून गुणवत्तेत त येऊन शाळेचे नाव नावलौकिक करण्याचा संकल्प केला.