प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली इथे जागतिक महिला दिनाचे उत्साहात साजरा.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली इथे जागतिक महिला दिनाचे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.निर्मल कपले सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली.अध्यक्ष म्हणून मा.शितल राजापूरे मॅडम जिल्हा समन्वयक चंद्रपूर मूख्य अतिथी म्हणून मा.बूरांडे मॅडम तालुका समूह संघटक मूल, डॉ.समता लिंगायत मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली, चिरोली येथील सरपंच सौं मिनल लेनगूरे,सौ योगीता गेडाम सरपंच दाबगाव मक्ता,जानाळा येथील सरपंच,आगाडी येथील सरपंच,कांतापेठ येथील सरपंच तसेच टोलेवाही येथील पोलिस पाटील सौ.चल्लावार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध गावांतील महिलांनी खेळाच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद पटकावले.मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले.कार्यक्रमा मध्ये मनोरंजनात्मक असे महीला चे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी मेंढे आशा कार्यकर्ती दाबगाव मक्ता यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोर्णिमा किर्तिवार आशा कार्यकर्ती चिरोली यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालू ताई गेडाम आशा कार्यकर्ती सूशी दाबगाव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोलीचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे सर यांनी मोलाचे योगदान दिले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथील कर्मचारी तसेच सर्व आशा कार्यकर्त्यां यांनी मोलाचे सहकार्य केले.विविध रंगारंग कार्यक्रमानी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.