राज्य नर्सेस संघटनेचा बेमुदत संप.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : अमरदीप लोखंडे) दिनांक,१३/०३/२३ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता दि.14.3.2023 ला बेमुदत संपाचा इशारा मा.महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,गिता खामनकर यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे जिल्हा सचिव मा.रंजना कोहपरे तसेच राज्य नर्सेस संघटनेचे सरचिटणीस यांनी सुद्धा संपाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनाच्या वतीने विविध खालील मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येत आहे.प्रमुख मागण्या NPS रद्द करा, जुनी पेन्शन योजना(ops)पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा,PFRDA कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतन नियमित करा,कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी रद्द करा, सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटवा,शिक्षक शिक्षकेतर व पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा,अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या नियुक्त्या विनाशर्त करा,
आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवातर्गत आश्वसित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतन वाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची घोषणा करा व इतर महत्त्वाच्या 10 मागण्या मान्य करा,वरील सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.