नक्षल्यांनी केली वाहनांची जाळपोळ - जाळपोळीत जेसीबी,बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टरचा समावेश.


 

नक्षल्यांनी केली वाहनांची  जाळपोळ - जाळपोळीत जेसीबी,बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टरचा समावेश.


एस.के.24 तास


छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामासाठी कंत्राटदराने आणलेली वाहने २ जेसीबी, २ बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टर यांची जाळपोळ केली असून लावलेल्या आगीत सर्व वाहने जळून खाक झाल्याची घटना छत्तीसगड राज्यातील कोयलीबेड़ा पीएस भागात कांकेर येथे आज सोमवार रात्रीच्या सुमारास घडली आहे.


महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यातील काही जिल्ह्यात व सिमांकित भागात मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया होतांना दिसून येतात. नक्षलग्रस्त भागात जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांकरिता नक्षलवाध्यांकडून कां बरं विरोध केल्या जाते. 


हे अजूनपर्यंत कळलेले नाही.एकीकडे आम्ही लोकांसाठी काम करतो असे त्यांच्या कडून भासविले जाते. मात्र निष्पाप व जन सुविधेसाठी पुढाकार घेणाऱ्यांना दडपल्या जात आहे. नक्षल्यांच्या या कृतींमुळे नेमका उद्देश काय? हे अजूनपर्यंत कळलेले नाही. केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणे हा उद्देश आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !