जिल्हा महिला काॅंग्रेस कमेटी व मुल महिला काॅंग्रेस कमेटीच्या वतीने कांतापेठ येथे महिला दिन साजरा.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन दिनांक १३ मार्चला चंद्रपूर जिल्हा महिला काॅंग्रेस कमेटी व मूल महिला काॅंग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक चंद्रपूरचे अध्यक्ष व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते सन्मा.संतोषभाऊ रावत यांचे मार्गदर्शनात मौजा कांतापेठ येथे महिला दिन साजरा करण्यात आला.
सदर महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात काम करणा-या महिला बचत गटातील महिला भगीनिंना शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा महिला काॅंग्रेस अध्यक्षा, सौ.नम्रताताई ठेमस्कर,मुल तालुका महिला काॅंग्रेस अध्यक्षा सौ.रुपालीताई संतोषवार, कांतापेठ येथील सरपंच सौ.वैशाली निकोडे सौ.ललीता फुलझेले,फरजाना शेख, शाॅमल बेलसरे, लता निंदेकर,पोलीस पाटील चल्लावार ताई,सौ.शितल कातकर,लताताई बारापात्रे,सुनिल शेरकी सर,गुरुदास चौधरी सर,राजेंद्र वाढई उपस्थित होते.