लेखक यवनाश्व गेडकर दया पवार राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित.

लेखक यवनाश्व गेडकर दया पवार राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित.


एस.के.24 तास


चंद्रपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन (मोरभवन)   मधुरम सभागृहात आयोजित  सत्कार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, समाजभूषण, जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत.


 त्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रपूर येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यवनाश्व शिवराम गेडकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते ' आणि असा मी घडत गेलो ' या ( आत्मचरित्र ) ग्रंथास ' दया पवार राष्ट्रीय पुरस्कार ' आणि  साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल  " डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यभूषण पुरस्कार " देण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दिपककुमार  खोब्रागडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.के.पी.वासनिक (दिल्ली),मल्लेश चौगुले (बेळगांव),डॉ.जगन कराडे (कोल्हापूर)‌हे  प्रामुख्याने उपस्थित होते. 


लेखक यवनाश्व शिवराम गेडकर‌ हे  नक्षत्राचं देणं काव्यमंच चे चंद्रपूर जिल्हा प्रमुख असून त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या  "आणि असा मी घडत गेलो " या स्वकथन ग्रंथास यापुर्वीही  जूनासुर्ला येथे आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनात  बापुराव टोंगे स्मृति आत्मकथन  हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. वरील दोन्ही पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याने निवड मंडळाचा शतशः ऋणी असल्याची भावना यवनाश्व गेडकर यांनी बोलून दाखवली आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने यवनाश्व गेडकर यांचे अभिनंदन केले गेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !