महागाई व गॅस सिलेंडर दर वाढी विरोधात निवेदन.
★ उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या माध्यमातून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन.
अमरदीप लोखंडे सहसंपादक एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे तहसिल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत,मा.पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झालेले आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे बेरोजगारी,भुकबळी वाढलेली असल्यामुळे तरूणांचे भविष्य धोक्यात आलेले असुन विद्यार्थ्यांची शिष्यवृती वेळेवर मीळत नाही, शिक्षण बरोबर मीळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश आलेले आहे. ठिकठिकाणी दारूचे बार सुरू असल्यामुळे तरूण पीढी आहारी जात आहे, व्यसनाधिन होत आहे.नौकरीच्या जागा काढणे बंद झालेल्या आहेत.
आत्महत्येचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असुन अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे. वंचित बहुजन महिला आघाडी च्या सर्व महीलांनी मिळुन वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. महागाई कमी करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीनाताई रामटेके यांनी यावेळी दीला.
लता मेश्राम,कीरण मेश्राम,शारदा घोनमोडे,वंदना कांबळे,लतीका मेश्राम,शितल गायकवाड, अस्मिता क-हाडे, चंदा माटे,करूणा मेश्राम, भावना नंदागवळी,साधना लोखंडे,प्रमीला पाटील, योगीता रामटेके,प्रतीमा डांगे,प्रीती हुमणे व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.