अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शेतकरी शेतमजूर एल्गार परिषद तर्फे मान. मुख्यमंत्री यांना निवेदन.
राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास
अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन विद्यमान तहसीलदार कोरपना यांना शेकडो कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यां द्वारे देण्यात आले.
सध्या शेतकरी शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे विविध समस्या आणि शेतकरी ग्रासल्यामुळे शेतकरी शेतमजुरांचा आर्थिक उत्पन्नाचा स्तर अतिशय कमी झालेला आहे शेतकरी वर्ग आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये भटकंती करून मजुरी मिळण्यासाठी जात आहे त्यामुळे खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
1) वन्यप्राणी शेतात घुसून पिकाच्या नुकसान करतात त्यामुळे वन्य प्राण्यांचा शासनाने बंदोबस्त करावा त्यावर नियोजन करावे व नुकसान झालेल्या पिकांचा योग्य मोबदला द्यावा.
2) अल्पभूधारक शेतकऱ्यांना धडक विहिरी योजनेअंतर्गत ताबडतोब वीर खोदकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
3) अल्पभूधारक शेतकऱ्यांना बोरवेल मोटर पंप सहित विज 100 % अनुदानावर उपलब्ध करून द्यावी.
4) शेतीच्या मालाचे हमीभाव एप्रिल पूर्वीच जाहीर करावे जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभावाच्या नुसार पिकाची लागवड करता येईल व आर्थिक नुकसानीतून सुटका मिळेल.
5) शेतकऱ्यांना शेतामध्ये लागवड करण्यासाठी औषधी व मजुरांचा खर्च एकरी दहा हजार रुपये मजूर खर्च द्यावा.
6) शेतकरी शेतात पिकवणारा भाजीपाला हा मार्केटमध्ये असणारे किंमत कधी कधी प्रचंड कमी असते व त्यामुळे त्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागतो त्यामुळे प्रत्येक गावात शीतगृह व धान्य साठवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था प्रत्येक गावात करण्यात यावी.
7) शेतकरी हा वयाच्या पंधरा वर्षापासून शेतात राबराब राबतो परंतु वाढत्या नंतर त्याला व त्याच्या पत्नीला व्यवस्थित जीवन सुद्धा जगता येत नाही हा देशाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर दोघांनाही पेन्शन योजना चालू करावी.
8) वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी शेतमजुरास व गावकऱ्याच 25 लाख रुपये नुकसान भरपाई व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात हत्या झालेल्या शेतकरी व शेतमजुरास व गावकऱ्यास एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
9) वन्य प्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या व गावकऱ्यांच्या हत्या होत असल्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या वन विभागावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात यावी.
10) अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे त्वरित देण्यात यावे व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याप्रमाणे शासनाच्या योजनेचा लाभ देण्यात यावा.
व इतर अनेक मागण्या सहित निवेदन देण्यात आली अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानाजी आदे, प्रकाश मोरे ,अमर शेंडे ,बापूजी सोनुले, नामदेव वाढाई ,प्रदीप रामदास गुरनूले ,संदीप आदे ,संजय बोरले, गणेश आदे, रविंद्र आदे, विनोद शेंडे ,शंकर वाढ ई ,संतोष महाडोळे ,शंकर शेंडे ,माधव आदे, आकाश मांदडे ,संदीप मोहुर्ले ,विजय सोनुले, अरुण डोलकर ,दत्तात्रय मोरे ,चंद्रशेखर आदे, रवींद्र बांदेकर ,आशिष आदे,मारुती चौधरी, प्रणय मोरे, यादव गाउत्रे ,सुभाष बोरुले, धनंजय बोरुले ,गजानन लेनगुरे ,माधव आदे,रवींद्र आदे, व कोरपणा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.