त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे शाखा एटापल्ली, च्या वतीने जागतिक महिला दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती व सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा.



त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे शाखा एटापल्ली, च्या वतीने जागतिक महिला दिन व  छत्रपती शिवाजी महाराज जयंती व  सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा.


एस.के.24 तास


एटापल्ली : जागतिक महिला दिनाचे निमित्याने जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे शाखा एटापल्ली, च्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली या ठिकाणी जागतिक महिला दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शिक्षणाच्या महात्म्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन एकत्रित साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री माननीय व्ही. शेख सर (उप प्राचार्य),तसेच जिल्हा परिषद हायस्कूल येथील शिक्षक मा.गोपाल गोळे सर, श्रीमती. प्रांजली शेटे,मा.पी.रामटेके सर,प्रा. श्री.जी.आत्राम सर,प्रतिमा करमरकर मॅडम, मनोज बनसोड सर,वैरागडे सर,प्रा.के.डोंगरे मॅडम, आणि कार्यक्रमाचे सह अध्यक्ष म्हणून लाभलेले त्रिशरण फाउंडेशन संस्था पुणे येथील प्रभारी जिल्हा समन्वयक मा.श्री.मंगल मशाखेत्री हे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन बनसोड सर यांनी केलं. तर संचालन मारोती मट्टमी (स्वयंसेवक TFP) यांनी केलं.स्वागतगीत शेवंता नरोटी, मंजुषा नरोटे, कुमोदीनी कुमरे,वनिता पूंगाठी यांनी सादर केला.या कार्यक्रमाचे नियोजन त्रिशरण फाउंडेशन पुणे शाखा एटापल्ली चे स्वयंसेवक यांनी केलं.यांत स्वयंसेवक रोशन मडावी,रिषभ दुर्गे, मंगेश दुर्वा, विनोद पदा,किडू मट्टामी हे उपस्थित होते. कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले असून.महिला सक्षमीकरणाचे धडे स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थांना मिळाले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !