सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात कळमन्याची स्मार्टगावाच्या दिशेने वाटचाल. ★ विविध उपक्रम,विकासकामांद्वारे आदर्श गाव बनविण्याचा घ्यास : सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण.

सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात कळमन्याची स्मार्टगावाच्या दिशेने वाटचाल. 


विविध उपक्रम,विकासकामांद्वारे आदर्श गाव बनविण्याचा घ्यास : सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण. 


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


राजुरा : राष्ट्रसंताचे अनुयायी, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते, कळमनाचे सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथील राष्ट्रसंतांचे अनुयायी,बहुजन चळवळीचे कार्यकर्ते स्मार्ट आदर्श सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या कारकीर्दीला दोन वर्षे पूर्ण झाले.या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कळमना हे गाव स्वच्छ,सुंदर,पर्यावरण पूरक,आदर्श व स्मार्ट करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामस्थांना घेऊन परिश्रम घेतले व एक व्यापक अभियान सुरू केले. गावात शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक व आध्यात्मिक वातावरण उत्साहवर्धक व उत्तम करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.


सरपंच झाल्यानंतर कळमना येथे ग्रामपंचायतची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी यासाठी त्यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायतला जनगणमन हे राष्ट्रगीत सकाळी लावून राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला व ते नित्यनेमाने चालू आहे.त्याचबरोबर कळमना हे गाव स्वच्छ,सुंदर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या मार्फत गावामध्ये घंटागाडी सुरू करून घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा उचलून गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम अधिरथ चालू आहे. 


वृक्षारोपणासारखा जागतिक दर्जाचा कार्यक्रम कळमना येथे राबवून रस्त्याच्या दुतर्फा, घरोघरी वृक्ष लागवड करून दोन हजार वृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे.एवढेच नव्हे तर स्मशानभूमीच्या जागेवर ऑक्सिजन पार्क उभारून समाजाला एक नवीन संदेश दिलेला आहे. त्या स्मशानभूमीवर आंबा,नींबू,पेरू,चिकू, नारळ,आवळा,कडुनिंबू व अनेक फुले झाडे व फड झाडे लावून स्मशानभूमी स्वच्छ सुंदर व पर्यावरण मुक्त करण्याचा त्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे.


 गावामध्ये पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था निर्माण करण्याकरता आरोची निर्मिती त्यांनी केलेली आहे.रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक लावून गाव सुंदर व स्वच्छ आकर्षक करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.कळमना येथील नालीचे सगळे उघडे गटारे बंदिस्त करून गावातील लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी सुद्धा त्यांनी सगळी नालीचे गटारे बंदिस्त केले आहे. गावातील जुने हनुमान मंदिर व त्याच्या परिसरातील सगळा भाग पेवर ब्लॉक व स्टील गार्डिंग लावून स्वच्छ व सुंदर केलेला आहे. कळमना हा गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावामध्ये सुलभ सार्वजनिक शौचालय बांधून गाव हागणदारी मुक्त त्यांनी केलेला आहे.


त्यांच्या या सोज्वळ कल्पनेमुळे गाव हगणदारीमुक्त व स्वच्छ सुंदर झालेला आहे.कळमना येथे गावामध्ये स्ट्रीट लाईट आहे.त्या स्ट्रिट लाईट वर मोठे मोठे पथ दिवे लावून शहरी भागासारखा प्रकाश निर्माण करून गाव प्रकाशमान केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत महिलांना मजबूत व सबलीकरण करण्यासाठी त्यांना कळमना येथे सुंदर कार्यालय देऊन महिला भगिनींचा मनोबल वाढवली आहे.कळमना येथे स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने जेष्ठ नागरिका करता गार्डन उभारले आहे.या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना विसावा घेता येईल व त्यांच्या जीवनामध्ये जगण्याचा आनंद निर्माण होईल यांची सुद्धा जबाबदारी सरपंच म्हणून,नंदकिशोर वाढई यांनी घेतली आहे. 


कळमना येथे जनतेला संजय गांधी निराधार योजना,वृध्दपकाळ योजना,दीनदयाल उपाध्याय योजना,अन्नसुरक्षा योजना इत्यादी अनेक योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळवून दिलेला आहे.कळमना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे ई लर्निंग व शाळा सुंदर स्वच्छ करण्याचा त्यांचा मानस आहे.त्यासाठी शासनाकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे.कळमना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सुद्धा सुंदर असे स्मारक त्यांनी उभारले आहे. गावामध्ये सुसज्ज असं वाचनालय ते उभारत आहेत.त्याच्यासाठी सुद्धा शासनाचा निधी प्राप्त झालेला आहे. 


ते नेहमी गावातील किंवा परिसरातील लोकांसाठी आरोग्य सेवेसाठी रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते आहे व ते नेहमी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात.अनेक लोकांना त्यांच्या आरोग्य सेवेचा परिचय आलेला आहे.कळमना येथे घरोघरी कुंड्या, फुलांची व शोभेची झाडे देऊन गावातील घरांचे पर्यायाने घरातील लोकांचे सौंदर्य वाढवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. कळमना येथे लोकसहभागातून माती,रेती टाकण्याचा उपक्रम असेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याबद्दल लोक जागृती असेल अशा अनेक  नवीन नवीन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ते काम करत आहे. एवढेच नव्हे तर कळमना येथील गावातील जनतेचा मृत्यू झाला तर त्यांचे अंत्यसंस्कार च्या वेळी ग्रामपंचायत कडून पुष्पचक्र व साडी चोळी देऊन त्यांना शेवटची मानवंदना सरपंच समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्याची व्यवस्था करीत आहेत. 


अशा कल्पक राष्ट्रसंताचा कार्यकर्ता असलेला सरपंच नंदकिशोर वाढई हे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता सगळ्या गावापेक्षा वेगळं असं स्टील बेंजेची व्यवस्था कळमना येथे केलेली आहे.ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था केल्यामुळे त्यामध्ये त्यांचा विरंगुळा होतो आहे. एवढेच नव्हे तर इतिहासात नोंद घ्यावी असे दानशूर समाजसेवक प्रथम सरपंच,स्वर्गीय नागोबा पाटील वाढई यांचा पुतळा व स्मारक उभारले आहे.


त्यांच्या या स्मारका मधून नितांत समाजसेवेचे व्रत सरपंच,नंदकिशोर वाढई हे नित्यनेमाने चालवत आहे.विशेष म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार करत असताना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ग्रामपंचायतला सरपंचाची खुर्ची न ठेवता ग्रामपंचायतीच्या कुठल्याही खुर्चीवर कोणी बसावं व सगळे मिळून कारभार करावा यासाठी त्यांनी स्वतःची खुर्ची सुद्धा ग्रामपंचायत मध्ये ठेवलेली नाही असा ध्येयवेळा सरपंच कळमना गावासाठी लाभलेला आहे.


ही जमेची बाजू आहे.परिसरातील गावागावांमध्ये सुद्धा असे सरपंच निर्माण झाले पाहिजे अशी भावना निर्माण होत आहे.अशाप्रकारे सरपंच नंदकिशोर वाढई हे अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असून सर्व सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या या नेतृत्व कौशल्य व सेवा कार्याने प्रभावित होऊनच काँग्रेस पक्षाने त्यांना काँग्रेस ओबीसी विभागाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष, पदी निवड करून त्यांना व्यापक कार्य करण्याची संधी दिली आहे तर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विदर्भ महासचिव पदावर सुद्धा ते उत्तम काम करीत आहेत.


 

निश्चितपणे एक सामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता ते गावचा सरपंच तसेच वर उल्लेखित विविध जबाबदाऱ्या ते चोखपणे बजावीत आहेत. त्यांच्या हातून दिवसेंदिवस असेच उत्तम कार्य घडत राहावे हिच मनोकामना करतो व त्यांचे पुन्हच हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. 

- महादेव ताजने.अध्यक्ष,गुरुदेव सेवा मंडळ कळमना(वाढई).

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !