राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत ख्रिस्तानंद चा तुषार पचोरी राज्यातुन प्रथम.


 राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत ख्रिस्तानंद चा तुषार पचोरी राज्यातुन प्रथम.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी :(अमरदिप लोखंडे) दिनांक,१२/०३/२३ क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रिडा परीषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, चंद्रपुर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा जिल्हातील बल्लारशहा येथिल विसापुर येथिल तालुका क्रिडा संकुल येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या होत्या.सदर राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये राज्यभरातिल विविध विभागातुन अनेक स्पर्धक आलेले होते. 


यात ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ,ब्रम्हपुरी येथिल आठव्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी तुषार देवेंद्र पचोरी याने २०० व १०० मिटर धावण्याच्या व लांबउडी स्पर्धेत राज्यातुन प्रथम क्रमांक मिळविला.


तुषार ने यापुर्वी ही जिल्हातुन व विभागातुन प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.तुषार ने  अनेक दिवसापासुन सदर स्पर्धेची  जोमाने प्राक्टिस केलेली असुन आई वडिलांच्या तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्पर्धेत यश प्राप्त केलेले आहे.

 

तुषार च्या नेत्रदिपक यशाबद्दल ख्रिस्तानंद विद्यालयाचे व्यवस्थापक फादर कुरियन,मुख्याध्यापिका सिस्टर पावना, उपमुख्याध्यापिका सिस्टर जिन्सिटा तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काैतुक केलेले आहे.तसेच परीसरातुन तुषार वर काैतुकांचा वर्षाव होत आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !