एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) रणरागिणी नॅशनल पुरस्कार सन्मान 2023 पुरस्कार सोहळा कार्यक्रम वेध फाऊंडेशन व जाधवर इन्स्टिट्यूट जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री,लेखिका सौ. उषा शीलवंत घोडेस्वार यांना भंडारा जिल्ह्यातून रणरागिणी नॅशनल पुरस्काराने पुणे जिल्ह्यातील वेध फाऊंडेशन, जाधवर इन्स्टिट्यूट सभागृह पुणे येथे दि. 12 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता वेध फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा,स्वाती मोराळे सहकार आयुक्त अनिल कवडे,आय पी एस स्मार्तना पाटील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने धर्माचार्य शंकर महाराज जाधवर इन्स्टिट्यूट चे संचालक मंडळाच्या सुरेखा जाधवर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त सौ .उषा घोडेस्वार यांचे मागील 16 वर्षापासून समाजसेविका म्हणुन कार्य सुरू आहे,6 वर्ष व्यसनमुक्ती व वृद्धाश्रमासाठी त्यांनी कार्य केले.गेल्या काही वर्षांपासून गावागावात जावून गरजू युवक युवतींना कौशल्य विकास योजना राबवून रोजगारांच्या संद्या उपलब्ध करून देण्याचे अतिशय कौतुकास्पद कार्य करत आहे. 2006 पासून कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषाताई यांचं लिखाण त्या तक्षशिल या नावाने करतात. 1000 च्या वर कविता आणि त्यांचे 1000 सुविचार लवकरच पूर्ण होत आहेत,
आपल्या सुविचार व लेखनाच्या माध्यमातून त्या नेहमीच समाज प्रबोधनाचं कार्य करीत असतात. आपल्या प्रगतीचे व पुरस्काराचे श्रेय त्या आपल्या घोडेस्वार कुटुंब व खोब्रागडे कुटुंब यांना देतात. आणि या पुरस्कारासाठी विशेष श्रेय प्रशांत रामटेके यांना देतात पुरस्कार मिळाल्यापासून त्यांचे कुटुंब, व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या कडून अभिनंदन केले जात आहे.