नायब तहसीलदाराला अटक ; संप काळातही लाच घेतली, ★ उत्तर महाराष्ट्रात एसीबीच्या पथकाची मोठी कारवाई.

नायब तहसीलदाराला अटक ; संप काळातही लाच घेतली,


★ उत्तर महाराष्ट्रात एसीबीच्या पथकाची मोठी कारवाई.


एस.के.24 तास


जळगाव : जुनी पेन्शन योजना ( Old Pension ) लागू व्हावी यासाठी राज्यभरातील लाखो कर्मचारी संप करत आहे. त्यातच अनेक शासकीय कामे रखडत असतांना वैद्यकीय सेवा देखील कोलमडली आहे. अशातच सोशल मिडियावर ( Social Media ) जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून संपकऱ्यांवर टीका होऊ लागली आहे. पगार पाहिजे, पेन्शन पाहिजे आणि लाच पाहिजे अशा आशयाचे पोस्टर शेयर करत टीका होत असतांना जळगावमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नायब तहसीलदार आणि कोतवाल यांना 25 हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. संपकाळात लाच घेतल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


जळगाव येथील धरणगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू करणाऱ्या व्यक्तीकडून लाच घेतांना ही अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.


अवैध वाळूची वाहतूक करू देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईची संपूर्ण राज्यात चर्चा होऊ लागली आहे.


सर्व शासकीय कार्यालये ओस पडलेली असतांना नायब तहसीलदार आणि कोतवाल यांनी लाच घेतल्याने संपकऱ्यांवरही टीका होऊ लागली आहे. नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे यांना अटक केली आहे.


नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे.


सध्या वाळूच्या संदर्भात कुठलेही लिलाव सुरू नसतांना हा प्रकार समोर आल्याने जळगावमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !